
नांदेड(प्रतिनिधी)-हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, बहुजन प्रतिपालक, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. शिवजयंतीच्या अनुषंगाने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या स्वच्छतेची आणि अन्य कामाची पाहणी माजी मंत्री डी पी सावंत, आ. मोहनअण्णा हंबर्डे यांच्यासह महापौर सौ जयश्री निलेश पावडे यांनी आज सायंकाळी केली.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या जन्मोत्सवामध्ये नांदेड शहर व जिल्ह्यातील हजारो शिवभक्त सहभागी होत असतात. गेल्या दोन वर्षापासून कोरोणा महामारीच्या संकटामुळे शिवजयंती साजरी करण्यात आली नव्हती. यावर्षीचा शिवजन्मोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे . त्या अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची स्वच्छता, डागडुजी आणि सुशोभिकरणाचे काम महानगरपालिकेच्या वतीने सुरू करण्यात आले आहे. या कामाची आणि पुतळ्याची पाहणी करण्यासाठी माजी मंत्री डी पी सावंत आज सायंकाळी येथे उपस्थित झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ हायड्रोलिक पायऱ्या उभा करण्याच्या अनुषंगाने संबंधितांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे यावेळी माजी पालकमंत्री डी पी सावंत आणि महापौरांनी सांगितले . येथे पायऱ्या उभरव्यात अशी मागणी नुकतीच विविध सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली होती. त्याअनुषंगाने ही माहिती देण्यात आली .

त्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ सुरु असलेल्या विविध विकास कामांची पाहणी आमदार मोहन अण्णा हंबर्डे यांनी केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी उभारण्यात आलेल्या पायऱ्या चढणे उतरण्यासाठी अडचणीचे ठरत असल्याने त्यांचे नूतनीकरण करण्याचे काम सुरू आहे. या कामाची पाहणी यावेळी आमदार मोहन हंबर्डे यांनी केली .
यावेळी महापौर सौ जयश्री निलेश पावडे ,स्थायी समितीचे सभापती किशोर स्वामी ,महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सुनील लहाने, अतिरिक्त आयुक्त गिरीष कदम , सभागृह नेते मेहश कनंकदडे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष एडवोकेट निलेश पावडे, शहर काँग्रेस कमिटी कोषाध्यक्ष विजय येवणकर, महेंद्र पिंपळे , दीपक पाटील, नागनाथ गड्डम, विठ्ठल पाटील, दुष्यंत सोनाळे, किशन कल्याणकर यांच्यासह अनेकांची यावेळी उपस्थिती होती.
