नवीन नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड शहर युवक काँग्रेसचे महासचिव सतीश बस्वदे यांच्या वाढदिवसानिमित्त ८ फेब्रुवारी रोजी रक्तदान शिबीर व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. तर आ. अमर राजूरकर यांच्यासह लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी शुभेच्छा दिल्या.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी बस्वदे यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून शैक्षणिक साहित्य वाटप केले. तर जिजाऊ ब्लड बँकेच्यावतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. वाढदिवसाच्या निमित्ताने आ. अमर राजूरकर, माजी उपमहापौर विनय पाटील गिरडे, पक्ष पक्षप्रक्ते संतोष पांडागळे, नगरसेवक संदीप सोनकांबळे, किशन कल्याणकर, उदयभाऊ देशमुख, सिध्दार्थ गायकवाड, संजय इंगेवाड, प्रा.
ललिता शिंदे, भि. ना. गायकवाड, पप्पू कोंढेकर, विठ्ठल पावडे, रूपेश यादव, विक्की राऊतखेडकर, अजिंक्य पवार यांच्यासह सिडको परिसरातील नारायण कॉलबीकर, शेख लतीफ, आनंदा ड, वामन देवसरकर, देविदास पाटील, कदम, के. एल. ढाकणीकर, राजू लांडगे, सुदिन बागल, रवी थोरात, जिजाऊ ब्लड बँकेचे संचालक सुरज पाटील यांच्या सह पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, विविध राजकीय पक्षांच्ये पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी युवा गुप्रचे पदाधिकारी व कार्यकर्ते मयुर ठाकूर, सचिन वाघमारे, शिवम कदम, रूपेश कोटलवार, कृष्णा राज गिरडे, रोहीत पोदाडे, सुनिल हंबर्डे, सागर धोतरे, सुरज धोतरे,रवी रायभोळे लेखराज सिंगणकर, अंकुश जैस्वाल, रूपेश ढवळे, सचिन ढेबरे यांनी परिश्रम घेतले.