नांदेड(प्रतिनिधी)-विविध कारणांनी जप्त केलेल्या दोन चाकी, तीन चाकी आणि चार चाकी अशा एकूण 55 वाहनांची विक्री विमानतळ पोलीस ठाण्यात दि.18 फेबु्रवारी रोजी होणार आहे. ही वाहने आजही विमानतळ पोलीस ठाण्याच्या प्रांगणात पाहता येतील.
पोलीस अधिक्षक कार्यालयातील जनसंपर्क विभागाने जारी केलेल्या प्रेसनोटप्रमाणे पोलीस ठाणे विमानतळच्या हद्दीत विविध कारणांसाठी बेवारस स्थितीत जप्त करण्यात आलेली दोन चाकी, तीन चाकी आणि चार चाकी अशी 55 वाहने बऱ्याच दिवसांपासून पडलेली आहेत. याबाबत कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करून तहसीलदार नांदेड यांच्या परवानगीने ही बेवारस वाहने लिलावाद्वारे, जाहीर बोली लावून विक्री करण्याची परवानगी मिळाल्यानंतर आता या बेवारस 55 वाहनांचा लिलाव 18 फेबु्रवारी 2022 रोजी सकाळी 10 वाजता आयोजित केला आहे. जनतेतील ज्या लोकांना या वाहनांचे निरिक्षण करायचे असतील त्यांनी विमानतळ पोलीस ठाण्याच्या प्रांगणात या वाहनांचे निरिक्षण करू शकताल. या लिलावामध्ये पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांना भाग घेता येणार नाही तसेच कांही तांत्रिक अडचण आल्यास त्या दिवशीची वाहन विक्री करण्यासाठीची प्रक्रिया किंवा एक वाहन विक्रीपासून रोखण्याची प्रक्रिया हे अधिकार राखून ठेवण्यात आलेले आहेत.
विमानतळ पोलीस ठाण्यात 18 रोजी बेवारस वाहनांचा लिलाव