नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील अंकुर हॉस्पीटलजवळ एका व्यक्तीला खंजीरचा धाक दाखवून 16 हजार 700 रुपयांची लुट घडली आहे. शासकीय तंत्रनिकेतनमधील एक कक्ष फोडून चोरट्यांनी 35 हजारांचा ऐवज लंपास केला आहे. दोन दुचाकी गाड्या आणि एक मोबाईल चोरी झाली आहे. त्यात 1 लाख 5 हजार 270 रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. एमआयडीसी कुष्णूर येथून एक जुनी वेल्डींग मशीन 20 हजार रुपये किंमतीची चोरीला गेली आहे.
मयुर सुंदरराव कुलकर्णी यांना अंकुर हॉस्पीटलसमोरून 12 फेबु्रवारी रोजी सायंकाळी 6 वाजता कांही जणांनी खंजीरचा धाक दाखवून त्यांच्या खिशातील मोबाईल 16 हजार 500 रुपयांचा व रोख रक्कम 200 रुपये असा 16 हजार 700 रुपयांचा ऐवज लुटला आहे. शिवाजीनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस उपनिरिक्षक सोनकांबळे हे करीत आहेत.
शासकीय तंत्रनिकेतन कार्यशाळा क्रमांक 2 चा दरवाजा चोरट्यांनी 11 फेबु्रवारीच्या रात्री 10 ते 11.30 अशा दीड तासाच्या वेळेत तोडला. त्यातून टुलबॉक्स, हॅमर, फाईल, ग्रॅंडर पाईप असा 35 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला आहे. शिवाजीनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार शेख अधिक तपास करीत आहेत.
अब्दुल जलील अब्दुल शकुर यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 जे.4385 10 फेबु्रवारीच्या रात्री 3 ते 3.30 वाजेदरम्यान गोरक्षण हमालपुरा येथून चोरीला गेली. या गाडीची किंमत 25 हजार रुपये आहे. शिवाजीनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस अंमलदार ढवळे करीत आहेत.
बंडू लक्ष्मणराव राठोड यांनी आपली दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 -5808 ही 65 हजार रुपयांची गाडी आणि त्यात एक मोबाईल 15 हजार 270 रुपयांचा 11 फेबु्रवारी रोजी रात्री 11.45 वाजता आसना नदीजवळील श्रीराम वजन काटा येथे उभी केली ती चोरीला गेली. विमानतळ पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
एसीसी ब्लॉक, एमआयडीसी कृष्णूर ता.नायगाव येथून 8-9 फेबु्रवारीच्या रात्री कोणी तरी चोरट्यांनी 20 हजार रुपये किंमतीची जुनी वेल्डींग मशीन चोरून नेली आहे. कुंटूर पोलीसांनी उमेश मदनलाल शर्मा यांच्या तक्रारीवरुन चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार गिते अधिक तपास करीत आहेत.
खंजीर दाखवून लुटले; तंत्रनिकेत फोडले, दुचाकी चोरी