२२ ते २४ फेब्रुवारी दरम्यान होणार परीक्षा
नांदेड(प्रतिनिधी)-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत घेण्यात येणाऱ्या पीएच.डी. कोर्सवर्क हिवाळी-२०२१ परीक्षेचे आयोजन यापूर्वीच्या वेळापत्रकाप्रमाणे १२ व १३ जानेवारी रोजी करण्यात आलेले होते. पण कोव्हीड-१९ ओमिक्रॉन या विषाणूमुळे या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्या परीक्षा आता दि.२२ ते २४ फेब्रुवारी दरम्यान ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहेत.
पीएच.डी. कोर्सवर्कच्या परीक्षा विद्यापीठ परिक्षेत्रातील तीन जिल्ह्यामध्ये घेण्यात येणार आहेत. यामध्ये नांदेड येथील परीक्षा केंद्रामध्ये बदल करण्यात आलेला आहे. जुने परीक्षा केंद्रा एैवजी नविन परीक्षा केंद्र देण्यात आलेली आहेत.पीपल्स महाविद्यालय (जुने परीक्षा केंद्र) एैवजी श्री. गीरुगोविंदसिंघजी अभियांत्रिकी महाविद्यालय नांदेड (नविन परीक्षा केंद्र). सायन्स कॉलेज नांदेड (जुने परीक्षा केंद्र) एैवजी औषध निर्माणशास्त्र संकुल, स्वारातीम विद्यापीठ (नविन परीक्षा केंद्र). यशवंत महाविद्यालय नांदेड (जुने परीक्षा केंद्र) एैवजी एम.जी.एम. अभियांत्रिकी महाविद्यालय (नविन परीक्षा केंद्र).परभणी येथील कमलताई जामकर महाविद्यालय या महाविद्यालयामध्ये परभणी आणि हिंगोली येथील विद्यार्थ्यांसाठी परीक्षा घेण्यात येणार आहेत. लातूर जिल्ह्यासाठी येथील दयानंद विज्ञान महाविद्यालय केंद्रावर सदर परीक्षा घेण्यात येणार आहे. नांदेड येथील परीक्षा केंद्रातील झालेल्या बदलानुसार सर्व सबंधित विद्यार्थ्यांनी सुधारित प्रवेशपत्र सबंधित महाविद्यालयातून प्राप्त करून घ्यावे.
सदर परिक्षेचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे. दि. २२ फेब्रुवारी रोजी स. ११:०० ते दु. २:०० वा. दरम्यान रिसर्च मेथोडोलॉजी या विषयाची परीक्षा होणार आहे. दि. २३ फेब्रुवारी रोजी स. ११:०० ते दु. १:०० वा. दरम्यान कॉम्प्युटर ऍप्लिकेशन या विषयाची परीक्षा होणार आहे. आणि दि. २४ फेब्रुवारी रोजी स. ११:०० ते १:०० दरम्यान रिसर्च अँड पब्लिकेशन इथिक्स या विषयाची परीक्षा होणार आहे. बदललेल्या परीक्षेबाबतची सुधारित माहिती व वेळापत्रक सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी व संशोधक मार्गदर्शकांनी याबाबतची नोंद घ्यावी, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. रवी सरोदे यांनी केली आहे.