नांदेड(प्रतिनिधी)-14 फेबु्रवारी रोजी सायंकाळी 4.30 वाजेच्यासुमारास एका देशी दारु वाहतूक करणाऱ्या टॅम्पोला थांबवून त्यातील दोन दारुचे बॉक्स बळजबरीने चोरणाऱ्या दोन चोरट्यांना विमानतळ पोलीसांनी कांही तासातच जेरबंद केले.
ज्ञानोबा निवृत्ती भेरजे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते आपला टॅम्पो क्रमांक एम.एच.26 एच.4847 मध्ये भिंगरी या देशी दारुचे बॉक्स घेवून 14 फेबु्रवारी रोजी दुपारी 4.30 वाजेच्यासुमारास जात असतांना ग्यानमाता शाळेच्या रस्त्यासमोर एम.एच.26 वाय.8565 या दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी त्याला टेम्पो खाली उतरवून धक्काबुक्की केली आणि टॅम्पोमधील देशी दारुचे दोन बॉक्स किंमत 5760 रुपयांचे बळजबरीने चोरून नेले. विमानतळ पोलीसांनी हा गुन्हा क्रमांक 16/2022 पोलीस उपनिरिक्षक एकनाथ देवके यांच्याकडे तपासासाठी दिला.
पोलीस निरिक्षक संजय ननवरे यांच्या अत्यंत कुशल मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक एकनाथ देवके यांनी या देशी दारु चोरट्यांना कांही तासातच पकडले. त्यांची नावे कैलास गोविंदराव कोल्हे (25) रा.गोविंदनगर नांदेड, अभिजित उर्फ गोलु सुभाष डाकोरे (20) रा.गांधीनगर अशी आहेत. दारु लुटतांना वापरलेली 75 हजार रुपये किंमतीची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 वाय.8565 पोलीसांनी जप्त केली आहे.
दारुवर दरोडा घालणारे दोन दरोडेखोर विमानतळ पोलीसांनी काही तासातच गजाआड केले