नांदेड(प्रतिनिधी)-मौजे खेर्डा ता.पाथरी येथील सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी बौध्द समाजाला पाणी देवू नका या घेतलेल्या निर्णयाविरुध्द रिपब्लिकन सेना जवळाबाजार यांनी जवळबाजार पोलीस चौकीत निवेदन देवून खेर्डा प्रकरणात कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
जवळबाजार येथील पंडीत सुर्यतळ, राजूभाऊ झोडगे, संजय गायकवाड, कृष्णा गायकवाड, करण वाघमारे, उत्तम गायकवाड, नयन सोनवणे, राहुल किर्तने यांनी पोलीस उपनिरिक्षक पोलीस चौकी जवळा बाजार यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात बौध्द समाजाला पाणी न देण्याचे धोरण मौजे. खेर्डा ता.पाथरी जि.परभणी येथील सरपंच आणि ग्राम पंचायत सदस्यांनी घेतले आणि अन्याय केला आहे. तेथील शासकीय बोअर बंद करून पाणी घेवू दिले नाही त्यामुळे पिढीतांना न्याय मिळावा अन्याय करणाऱ्यांवर कठोर कार्यवाही अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. न्याय न दिल्यास रिपब्लिकन सेना तिव्र स्वरुपाचे आंदोलन छेडेल असेही निवेदनात म्हटले आहे.
खेर्डा ता.पाथरी येथील घटनेसंदर्भाने रिपब्लिकन सेनेचे निवेदन