नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या घराचे बांधकामाचे नवीन छज्जे रस्त्यावर आणू नका असे सांगितले म्हणून एका 60 वर्षीय व्यक्तीवर तीन जणांनी जीवघेणा हल्ला केला. या हल्यात दोन जण जखमी झाले आहेत.
गोविंद शंकरराव मोरे (60) रा.सोनखेड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सोनखेड शिवारातील गट क्रमांक 5 मध्ये वेअर हाऊस लगत विजयसिंह पदमसिंह ठाकूर (34), पदमसिंह गणेशसिंह ठाकूर आणि दिपक पदमसिंह ठाकूर यांच्या मालकीच्या भुखंडावर बांधकाम सुरू होते. या घराच्या बांधकामाचे छज्जे रस्त्यावर अडथळा होईल असे घेवून नका अशी विनंती गोविंद मोरे यांनी ठाकूर कुटूंबियांना केली. पण त्यांनी ऐकले नाही आणि 15 फेबु्रवारी 2022 रोजी सकाळी 11 ते 11.30 वाजेदरम्यान सोनखेड येथे तीन ठाकूर कुटूंबियांनी गोविंद शंकरराव मोरे यांना कुऱ्हाड, लोखंडी रॉडच्या सहाय्याने मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यावेळी राजू मोरे यांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला असता ठाकूर कुटूंबियांनी त्यास सुध्दा मारहाण केली. सोनखेड पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक महादेव मांजरमकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक परिहार हे करीत आहेत.
सोनखेड गावात ज्येष्ठ नागरीकावर जीवघेणा हल्ला