नांदेड(प्रतिनिधी)-अर्धापूर शहरातील एक 7 वर्षाचा बालक बुधवारी सायंकाळी घराबाहेर खेळण्यासाठी गेला आणि परत आलाच नाही. आज शुक्रवारी या बालकाचा मृतदेह कॅनॉलमध्ये आढळून आला. त्याच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.
अर्धापूरपासून तामसा रस्त्यावर असलेल्या गणपतराव देशमुखनगर येथील स्वराज संतोष पानपट्टे (07) हा निरागस बालक 16 फेबु्रवारी रोजी सायंकाळी 6 वाजता खेळण्यासाठी घराबाहेर गेला. पण रात्री उशीरापर्यंत तो आला नाही. गुरूवारी नातेवाईकांनी अर्धापूर पोलीस ठाण्यात याची माहिती दिली. पोलीस निरिक्षक अशोक जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी या बालकाला शोधण्याचा भरपूर प्रयत्न केला पण यश आले नाही. आज 18 फेबु्रवारी सकाळी 8 वाजता चिमुकल्या स्वराजचा मृतदेह मार्ग पोलीस चौकीच्या मागे असलेल्या कॅनॉलमध्ये सापडला. बालकाच्या अशा या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
खेळण्यासाठी घराबाहेर गेलेल्या 7 वर्षीय बालकाचा मृतदेह 38 तासांनी सापडला