नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस अधिक्षक कार्यालयात आज 20 फेबु्रवारी रोजी बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांच्या अध्यक्षतेत साजरी झाली.
20 फेबु्रवारी हा बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिन शासनाने मोठ्या लढ्यानंतर बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव महापुरूषांच्या यादीत समावेश केल्यानंतर पहिल्यांदा सर्व शासकीय कार्यालयांमध्ये बाळशास्त्री जांभेकर जयंती साजरी करण्यात आली. आज पोलीस अधिक्षक कार्यालयात पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, पोलीस उप अधिक्षक (मुख्यालय) अर्चना पाटील, जनसंपर्क अधिकारी सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवाजी लष्करे आणि इतर अनेक पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार या प्रसंगी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन जनसंपर्क विभागातील पोलीस अंमलदार उत्तम वाघमारे, सुर्यभान कागणे, संजय सांगवीकर, विनोद भंडारे आदींनी केले.
पोलीस अधिक्षक कार्यालयात बाळशास्त्री जांभेकर जयंती साजरी