
नांदेड(प्रतिनिधी)-दुचाकी वाहनांमुळे न्यायालय परिसरात होणारी गर्दी पाहुन अनेक दुचाकी गाड्यांना न्यायालय ते रेल्वे स्थानक जाणाऱ्या रस्त्यावर न्यायालय परिसरा बाहेर उभे करावे लागल्याने या रस्त्यावर वाहतुकीची कोेंडी होत आहे. न्यायालय परिसरात वकील मंडळी, न्यायालयीन अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वाहनांना जागा देण्यात आली आहे. त्यामुळे न्यायालयासमोर, बाहेर, रस्त्यावर वाहन उभे करण्याशिवाय पर्याय नाही. यावर कधी तोडगा निघेल देवच जाणे.
नांदेड जिल्हा व सत्र न्यायालयात उपलब्ध असलेल्या जागेमध्ये दुचाकी, चार चाकी, वाहनांची गर्दी होवू लागल्याने तेथे अनेकदा समस्या होत होत्या. या समस्यांना दुर करण्यासाठी कांही पोलीस मंडळी न्यायालय परिसरातील मुख्य द्वाराच्या उजवीकडे एका पत्राच्या खोली बसू लागले. पोलीसांना प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी दिलेल्या आदेशांच्या आधारावर पोलीस काम करत होते. पण त्यामुळे वकील मंडळी, न्यायालयातील कांही कर्मचारी यांच्यात व पोलीसात खटके उडू लागली. काहीही होणारे असेल तरी पण न्यायालय परिसरात आजच्या परिस्थितीत उभ्या राहणाऱ्या दुचाकी गाड्या उभ्या करण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही हे मात्र सत्यच आहे.
आता या परिस्थितीत वकील मंडळी आणि न्यायालयीन अधिकारी, कर्मचारी मंडळी यांना वगळता इतरांची दुचाकी व चार चाकी वाहने न्यायालय परिसरातील सुरक्षा भिंतीबाहेर म्हणजे न्यायालय ते रेल्वे स्थानक जाणारा रस्ता किंवा न्यायालयाच्या दक्षीण बाजूकडे असलेला रस्ता यावर उभी करावी लागतात. या दोन्ही रस्त्यांवर वाहनतळ झाल्यामुळे सहज होणारी वाहतुक ठप्प झाली आहे. न्यायालय परिसरात नेमण्यात आलेले पोलीस इतरांची वाहने आत जावू देत नाहीत आणि यामुळे मुख्य रस्त्यावर होणाऱ्या वाहतुक कोंडीला कांही एक पर्याय दिसत नाही. अनेक जणांनी अनेक उपाय यावर सुचवले होते. तर त्यावर असे कोणत्या कायद्यात आहे असे प्रतिप्रश्न विचारण्यात आले. तरीपण न्यायालय परिसरात येणाऱ्या वाहनांमुळे सर्वसामान्य माणसाला सुध्दा वाहतुक कोंडीचा सामना करावा लागतो हे मात्र तेवढेच सत्य आहे.
