भोकर येथे घरफोडून 2 लाख 70 हजारांचा ऐवज लंपास
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक आणि भोकर शहरातील एक असे दोन घर बंद करून कुटूंबिय बाहेरगावी गेल्याचा फायदा चोरट्यांनी घेतला आणि दोन्ही घरातून मिळून 3 लाख 97 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. यासोबतच जिल्ह्यात अनेक दुचाकी गाडी चोरीच्या नोंदी पोलीस दप्तरी झाल्या आहेत.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मयुर अपार्टमेंट, केन्सर दवाखान्याच्या शेजारी राहणारे सराफ व्यापारी दिलीप प्रभाकर निल्लावार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 20 फेबु्रवारीच्या रात्री 8 वाजता ते आणि त्यांचे कुटूंबिय रात्री 8 वाजता घर बंद करून कुलूप लावून बाहेरगावी गेले. 21 फेबु्रवारी रोजी सकाळी 7.30 वाजता निल्लावार कुटूंबिय परत आले तेंव्हा त्यांचे घर फोडलेले होेते. चोरट्यांनी चॅनल गेटचे कुलूप आणि घराच्या मुख्य दरवाज्याचे कुलूप तोडून आत प्रवेश केला होता आणि घरातील 1 लाख 40 हजार रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिणे चोरून नेले होते. नांदेड ग्रामीण पोलीसांनी हा चोरीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस निरिक्षक श्री अशोकरावजी घोरबांड साहेब यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक श्री संकेतजी दिघे साहेब अधिक तपास करीत आहेत.
भोकर येथील सोनटक्के कॉलनीत राहणाऱ्या गणेश रघुनाथ हिंगमिरे यांनी 19 फेबु्रवारी रोजी सकाळी 5 वाजता आपल्या घराला कुलूप लावून कुटूंबियांसह बाहेर गावी गेले. ते 21 फेबु्रवारी रोजी सकाळी 9 वाजता परत आले तेंव्हा त्यांच्या घराचे कुलूप तोडलेले होते. घरातील कपाट फोडून चोरट्यांनी कपाटात ठेवलेले 2 लाख 57 हजार रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिणे चोरून नेले होते. भोकर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस निरिक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिखक अनिल कांबळे अधिक तपास करीत आहेत.
नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या अभिलेखावर वेगवेगळ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक मोटारसायकली चोरीला गेल्याच्या गुन्ह्यांच्या नोंदी दाखल आहेत.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत सराफ व्यापाऱ्याचे घर फोडले