विमानतळ पोलीसांनी गावठी पिस्तुल पकडले

नांदेड(प्रतिनिधी)-विमानतळ पोलीसांनी 23 फेबु्रवारी रोजी एका युवकाच्या ताब्यातून गावठी पिस्तुल जप्ती केले आहे. या पिस्टलसोबत मॅग्झीन मात्र नाही. या प्रकरणात तीन लोकांविरुध्द विमानतळ पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. एकाला अटक केली आहे.
विमानतळ पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार दारासिंग राठोड, त्यांचे सहकारी पोलीस कलंदर आणि गंगावरे हे 23 फेबु्रवारीला गस्त करत असतांना त्यांना चंद्रलोक हॉटेलसमोर एका माणसाकडे पिस्टल असल्याची माहिती मिळाली. तेंव्हा आपले पोलीस निरिक्षक संजय ननवरे यांना ही माहिती देवून सहाय्यक पोलीस निरिक्षक बाळू गिते आणि पोलीस अंमलार नागरगोजे यांना सोबत घेवून पोलीस पथक तेथे पोहचले असता एका व्यक्तीला समोर घेवून त्याचे नाव विचारले असता त्याने आपले नाव ऋषीकेश आनंदराव मोरे (26) रा.गांधीनगर असे सांगितले. त्याची तपासणी केली असता त्याच्या कंबरेला एक गावठी पिस्तुल सापडले. ऋषीकेश मोरेच्या सांगण्याप्रमाणे ही पिस्टल प्रविण उर्फ बाळू खोब्रे रा.गांधीनगर याची आहे. ही पिस्टल अनिल उर्फ रंगराव भांडवले याच्या घरातून घेवून येण्यास प्रविण खोब्रेने सांगितले होते. ती पिस्टल आणल्यावर माझ्याकडेच ठेवण्यास सांगितली. पोलीसांनी या पिस्तुल बाळगणाऱ्या ऋषीकेश मोरेला ताब्यात घेतले असून आरोपीच्या सदरात प्रविण उर्फ बाळू खोब्रे, अनिल रंगराव भांडवले यांचीही नावे लिहिली आहेत. विमानतळ पोलीसांनी या प्रकरणी भारतीय हत्यार कायद्याच्या कलम 3/25 आणि भारतीय दंड संहितेच्या कलम 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक बाळू गिते यांच्याकडे देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *