नांदेड(प्रतिनिधी)-मरण पावलेल्या माणसाच्या नावाची स्वाक्षरी करून त्याची नावावरचे वाहन दुसऱ्याच्या नावावर हस्तांतरीत केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रादेशिक परिवहन कार्यालयातील वरिष्ठ लिपीक जयश्री रामराव वाघमारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 27 सप्टेंबर 2021 रोजीच्या पुर्वी कधी तरी वाहन क्रमांक एम.एच.26 एस.5852 हे वाहन हस्तांतरण करण्याकरीता अर्ज आला. ते वाहन सुनिल किशन पाचंगे यांच्या मालकीचे होते. पण पुढे ही बाब लक्षात आली की, सुनिल किशन पाचंगे हे हस्तांतरण कागदपत्रापुर्वीच मरण पावले होते. तरीपण हस्तांतरण कागदांवर त्यांची बनावट स्वाक्षरी करून सिडको येथील देविदास बाबूराव पाचंगे यांनी ते वाहन बनावटपणे हस्तांतरण करून मरण पावणाऱ्या सुनिल पाचंगेची पत्नी आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय या दोघांची फसवणूक केली आहे.
या तक्रारीनुसार नांदेड ग्रामीण पोलीसांनी देविदास बाबूराव पाचंगे रा.शंकर नगरी सिडको विरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 467, 468, 470, 471 आणि 34 नुसार गुन्हा क्रमांक 105/2022 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक श्रीमान अशोकरावजी घोरबांड साहेब यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक उत्तम बुक्तरे यांच्याकडे देण्यात आला आहे.
मरण पावलेल्या व्यक्तीच्या नावावरचे वाहन बनावट स्वाक्षरी करून हस्तांतरीत