नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरातील इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका मोठ्या-भावाने लहान भावाचा खून केल्याचा प्रकार घडला आहे. तसेच नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन साडूंनी मिळून बहिणीला मारहाण करणाऱ्या भावाचा खून करून फेकून दिले आहे. पोलीसंानी या प्रकरणातील एकूण 3 आरोपींना अटक केली आहे. न्यायालयाने या तिघांना पोलीस कोठडीत पाठविले आहे.
शेख वली शेख खाजा मियॉं रा.कांजाळा ता.लोहा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचा भाऊ शेख चॉंद पाशा खाजा मियॉं (35) यास शेख जावेद शेख रब्बानी आणि शेख इकबाल शेख रब्बानी या दोघांनी संगणमत करून दारु पिण्याच्या सवईचा असणाऱ्या शेख चॉंद पाशाला दारु पिलेल्या अवस्थेत वाजेगाव येथील टापरे चौकाच्या जवळ 22 फेबु्रवारी रोजी गाठले आणि त्याला मारहाण करून तो मरण पावल्यानंतर त्याचा मृतदेह टापरे चौकाच्या शेजारी मोकळ्या जागेत फेकुन दिला. हा घटनाक्रम 22 फेबु्रवारीच्या रात्री 10 ते 23 फेबु्रवारीच्या पहाटे 8 वाजेदरम्यान घडला. मरण पावलेला शेख चॉंद पाशा हा दारु पिण्याच्या सवईचा होता, कामधंदा करत नव्हता आणि आपल्या बहिणीला सुध्दा मारत होता असे तक्रारीत लिहिलेले आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 108/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 302, 34 नुसार दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक श्री अशोकरावजी घोरबांड साहेब यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक विजय पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे. विजय पाटील यांनी आज 25 फेबु्रवारी रोजी पकडलेले शेख जावेद शेख रब्बानी या दोघांना आपले सहकारी पोलीस अंमलदार शेख रब्बानी, बालाजी लाडेकर आणि माने यांच्या रखवालीत न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायाधीश एम.बी.कुलकर्णी यांनी या दोन मारेकऱ्यांना 28 फेबु्रवारी 2022 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
चिरागगल्ली भागात राहणाऱ्या गंगाबाई बालाजीसिंह ठाकूर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 23 फेबु्रवारीच्या दुपारी त्यांचा मोठा मुलगा जुगनूसिंह ठाकूर याने त्याचा लहान भाऊ अरुणसिंह बालाजीसिंह ठाकूर याच्याकडे दारु पिण्यासाठी पैसे मागितले. पण छोटा भाऊ अरुणसिंहने पैसे दिले नाही तेंव्हा जुगनूसिंहने त्याला लाथाबुक्यांनी मारहाण करून त्याला जिवे मारले आहे. इतवारा पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 37/22 भारतीय दंडसंहितेच्या कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक साहेबराव नरवाडे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक आर.एस.मुत्त्येपोड यांच्याकडे देण्यात आला आहे.सहाय्यक पोलीस निरिक्षक आर.एस.मुत्येपोड आणि त्यांच्या सहकारी पोलीस अंमलदारांनी जुगनूसिंह बालाजीसिंह ठाकूर (35) यास न्यायालयात हजर केले. न्यायाधीश प्रविण कुलकर्णी यांनी जुगनूसिंहला पोलीस कोठडीत पाठविले आहे.
नांदेड शहरात दोन खून; तीन मारेकरी पोलीस कोठडीत