नांदेड जिल्ह्यात कोविडमुळे मरण पावलेल्या दोन पोलीस पाटलांना प्रत्येकी 50 लाख अनुदान

नांदेड(प्रतिनिधी)-कोरोना काळात आपले कर्तव्य पार पाडणाऱ्या दोन पोलीस पाटलांना कोरोना बाधेने मृत्यू दिला होता. राज्य शासनाने या पोलीस पाटलांच्या कुटूंबियांना 50 लाख रुपये अनुदान मंजुर केले आहे. याबाबतचा आदेश प्रशासन विभागाचे अपर पोलीस महासंचालक अनुप कुमार सिंह यांच्या स्वाक्षरीने नांदेड जिल्हा पोलीस दलाकडे पाठविण्यात आला आहे.

नांदेड जिल्ह्यात जोशी सांगवी ता.लोहा येथील पोलीस पाटील बाबूराव महाजन बंतलवाड यांना कोविड लागन झाली होती. त्यांच्यावर नांदेड येथील एका खाजगी रुग्णालयात कोविडचा उपचार सुरू असतांना 14 एप्रिल 2021 रोजी मृत्यू प्राप्त झाला होता. तसेच इब्राहिमपुर ता.देगलूर येथील पोलीस पाटील गंगाधर व्यंकटराव इंगळे यांचा उपचारादरम्यान हैद्राबाद येथे 9 एप्रिल 2021 रोजी मृत्यू झाला होता.

याबाबत नांदेड जिल्हा पोलीस दलाने पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी, पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांच्यावतीने या दोघांना शासनाच्या नियमावलीप्रमाणे 50 लाख रुपये अनुदान मिळावे असा प्रस्ताव पोलीस महासंचालक कार्यालयाकडे पाठविण्यात आला होता. महासंचालक कार्यालयाने तो प्रस्ताव शासनाकडे पाठवला. महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागाने 18 फेबु्रवारी 2022 रोजी हा प्रस्ताव मंजुर केला. त्यावर गृहविभागाचे कार्यासन अधिकारी डॉ.प्रविण ढिकले यांची स्वाक्षरी आहे. त्या आदेशाच्या अनुशंगाने पोलीस महासंचालक कार्यालयातील अपर पोलीस महासंचालक अनुपकुमारसिंह यांनी हा प्रस्ताव नांदेडला पाठवला आहे. या कोविडमुळे मरण पावलेल्या आणखी एक पोलीस पाटलांचा अनुदान प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *