हदगाव (प्रतिनिधी)- हदगाव शहरातील नवीन आबादी येथील सर्पमित्र बबन भुसारे यांनी बेंबळी तालुका जिल्हा उस्मानाबाद हद्दीत मंत्रिक महाराज होऊन नागरिक व भक्तजनांना अकरा लाख रुपये घेऊन अकरा कोटी रुपयाचा पाऊस पाडतो असे आमिष दाखवून अकरा लाख रुपयाची मागणी केली. बेंबळी हद्दीतील डोळे असून आंधळ्या भक्तजनांनी पूजेवर अकरा लाख रुपये ठेवले व मंत्रिक म्हणाले “मी पूजा-अर्चा करून प्रक्रिया पूर्ण करतो .तुम्ही न बघता आडोशाला अर्धातास थांबण्याचा सल्ला ” भोंदू महाराजांनी भक्तजनांना देऊन तेथून पैसे घेऊन गाशा गुंडाळून पळ काढत हादगाव गाठले .असल्याची माहिती “पोलिस सूत्रांनी “आमच्या प्रतिनिधी जवळ कथन केली असून बेंबळी तालुका जिल्हा उस्मानाबाद पोलीस स्टेशन ला सदरील मंत्रिक भोंदूबाबा विरुद्ध विलास श्रीरंग लोकरे . रा .इंगळे गल्ली .उस्मानाबाद .यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बेंबळी पोलीस ठाण्यात ग.र.नं. 67/ 21 कलम 420, 34 .प्रमाणे गुन्हा दाखल करून बेंबळी पोलीस मोबाईल लोकेशन घेत हदगाव येथे दाखल झाले .हदगाव पोलिस स्टेशनचे पोलिस जमादार विश्वनाथ हंबर्डे यांना भेटून इत्यंभूत माहिती सांगितली पोलिस निरीक्षक लक्ष्मण राख यांच्या मार्गदर्शनाखाली हंबर्डे यांनी शिताफीने दिनांक 10 सकाळी चार वाजण्याच्या सुमारास हदगाव येथील नई आबादी येथे भोंदूबाबा सर्प मित्राच्या घरी जाऊन बाहुल्या ,गंडे,दोरे व काही मुद्देमालासह त्यास जेरबंद करून पोलीस स्टेशन बेंबळी .तालुका जिल्हा उस्मानाबाद पोलिसांच्या स्वाधीन केले . सर्पमित्र अचानक “भोंदूबाबा ” कसे झाले याचे हदगाव शहरातील जनतेत आश्चर्य व्यक्त होत आहे.
पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून उस्मानाबाद जिल्ह्यातील नागरिकांना घातला गंडा; हदगाव येथील सर्पमित्र भोंदू बाबा बबन भुसारे गजाआड