नांदेड,(प्रतिनिधी)- आज कोरोनाने फक्त एक नवीन कोरोना बाधीत रुग्ण दिला आहे. दोन जणांची कोरोनाबाधेतुन मुक्ती झाली आहे.आज दोन गंभीर रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आलेल्या माहिती नुसार आज दि.28 फेबु्रवारी रोजी कोरोना बाधेने एका रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. आज 01 नवीन कोरोना रुग्ण सापडला आहे.नांदेड मनपा विलगिकरणातून-02 दोन रुग्णांची सुट्टी झाली आहे. त्यामुळे आजपर्यंत उपचार घेवून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 100042 झाली आहे. उपचाराने चांगले झालेल्या रुग्णांचे प्रमाण 97.35 टक्के आहे.आज सापडलेले कोरोना रुग्ण नांदेड मनपात एकच रुग्ण सापडला आहे. आज 711 अहवालांमध्ये 705 निगेटिव्ह आणि 01 पॉसिटीव्ह आहेत.त्यामुळे एकूण रुग्ण संख्या 102757 झाली आहे.आरटीपीसीआर तपासणीत 00 आणि 01 अँटीजेन तपासणीत असे एकूण 01 रुग्ण नवीन सापडले आहेत. आज स्वॅब तपासणी 00 अहवाल प्रलंबित आहेत. आज नाकारण्यात आलेले स्वॅब 05 आहेत. आज अनिर्णीत राहिलेले स्वॅब 00 आहेत.आज कोरोनाचे 25 ऍक्टीव्ह रुग्ण ज्यांच्यावर नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगिकरण-12, नांदेड जिल्हाच्या तालुक्यातील विलगीकरण-06,सरकारी रुग्णालय -05, खाजगी रुग्णालयात- 02, असे उपचार सुरू आहेत यात अती गंभीर स्वरुपात 02 रुग्ण आहेत.
Related Posts
माळाकोळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भिम जयंती मंडळांना पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिले स्मृतीचिन्ह
नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस ठाणे माळाकोळी अंतर्गत महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी ठरवून दिलेले नियम पाळत महामानवाची जयंती साजरी करणाऱ्या मंगरुळ, माळेगाव आणि माळाकोळी…
नांदेडचे महापौरपद काँग्रेसचेच;पण कोणाच्या नशिबात ?
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे महापौर पद रिकामे झाल्यानंतर नवीन महापौर निवडीची अधिसुचना मनपाचे नगर सचिव सरदार अजितपालसिंघ संधू यांनी जारी…
लोकशाही सशक्तीकरणासाठी युवा मतदारांनी मतदानाचा हक्क बजावणे महत्वाचे – अपर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे
▪️प्रत्येक मतदारांच्या मतदानातच सक्षम व सुदृढ लोकशाहीचा मार्ग ▪️मतदान जागृतीसाठी निवडणूक विभागाचे विविध उपक्रम नांदेड (जिमाका):- देश घडवण्याची ताकद…