नांदेड(प्रतिनिधी)-शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी आरटीई प्रवेशासंदर्भाने शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी प्रवेश घेणाऱ्या बालकांची वयोमर्यादा निश्चित केली आहे.
सन 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी शाळा प्रवेशाच्यावेळेस बालकाचे किमान वय निश्चित करण्याच्या सुचना या आदेशात आहेत. शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबत राज्य शासनाने 31 डिसेंबर हा मानीव दिनांक सुनिश्चित केला आहे. जुलै ते नोव्हेंबर महिन्यात जन्म झालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुसान होऊ नये म्हणून आरटीई प्रवेशातील 25 टक्के बालकांच्या वयोमर्यादेला 31 डिसेंबर 2022 अखेर वय सुनिश्चित करण्यात आले आहे. ते पुढील प्रमाणे आहे.
प्ले ग्रुप/ नर्सरी वयोमर्यादा 1 जुलै 2018 ते 31 डिसेंबर 2019 किमान वय 4 वर्ष 5 महिने 30 दिवस. जुनिअर के.जी.वयोमर्यादा 1 जुलै 2017 ते 31 डिसेंबर 2018 किमान वय 5 वर्ष 5 महिने 30 दिवस. सिनिअर के.जी.वयोमर्यादा 1 जुलै 2016 ते 31 डिसेंबर 2017 किमान वय 6 वर्ष 5 महिने 30 दिवस. इयत्ता पहिली वयोमर्यादा 1 जुलै 2015 ते 31 डिसेंबर 2016 किमान वय 7 वर्ष 5 महिने 30 दिवस. शासनाने नवीन वयोमर्यादा सुनिश्चित केल्याने आता वर्षातील जुलै ते नोव्हेंबर जन्म घेतलेल्या बालकांसाठी प्रवेश सुकर होणार आहे.
आरटीई प्रवेशासाठी वयोमर्यादेत नवीन बदल