नांदेड,(प्रतिनिधी)- महाशिवरात्री नांदेड जिल्हात भारीच ठरली.काल एकूण पाच जणांचा खून पोलीस दप्तरी नोंदवण्यात आला आहे.एक जण अद्याप बेपत्ता आहे.या पाच जणांच्या खून प्रकरणातील काही आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.
महाशिवरात्रीदिनाची पहाट होताच गोदावरी नदीत एक २५-३० वर्षीय अनोळखी महिलेचे अर्धवट प्रत सापडले. याबाबत पोलीस अंमलदार संतोष बाळू राठोड यांच्या तक्रारीवरून अनोळखी महिलेच्या अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध वजिराबाद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनातसहायक पोलीस निरीक्षक शिवराज जमदडे तपास करीत आहेत.
देगाव चाळीत २ मार्चच्या पहाटे ४ वाजता पाणी भरण्याच्या वेळेत दिगंबर वामनराव राजभोज कुटुंब आणि शेजारी राहणारे कुटुंब यांच्यात कचरा घरासमोर का टाकला म्हणून भांडण झाले.त्यात काही जणांनी प्रफुल्ल दिगंबर राजभोज (३५) आणि संतोष दिगंबर राजभोज (३३) यांना पोटात,बरगडीत चाकूचे वार करून त्याचे खून केले आहेत.वजिराबाद पोलिसांनी या संदर्भाने मधुकर निवृत्ती राजभोज आणि अमोल गोविंदराव वाढव या दोन जणांना ताब्यात घेतले आहे.या भांडणात संदीप दिगंबर राजभोज (२७) आणि राहुल संजय धोंगडे (१८) असे दोन जण जखमी आहेत.या दुहेरी खुन प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक शिवराज जमदडे यांच्याकडे देण्यात आला आहे.
अर्धापूर तालुक्यातील अमराबाद तांडा येथे आणलेल्या डुकराच्या मटणाचा हिस्सा देण्याच्या कारणावरून श्रीनिवास बालाजी पवार यास पाच जणांनी लोखंडी रॉडने मारहाण करून त्याचा खून केला आहे. हा प्रकार २८ फेब्रुवारीच्या रात्री ९ वाजेच्या सुमारास घडला आहे.
हुनगुंदा ता. बिलोली येथे २१ फेब्रुवारी रोजी हरभरा पीक काढणाऱ्या दोन कामगार गटांमध्ये पैसे कोणाला किती या बाबत बावडा झाला.हे कामगार राजस्थान मधील आहेत असे सांगण्यात आले.रशीद खान हसन खान (४५) आणि त्यांचा मुलगा अमजद खान रशीद खान (१७) या दोघांचे अपहरण झाले.१ मार्च रोजी रशीद खानचा मृतदेह सापडला आहे.
या सर्व पाच खून प्रकरणांमध्ये अत्यंत किरकोळ कारणे समोर आली आहेत.म्हणजे माणसाच्या जीवाची किंमत किती कमी झाली आहे,हे दिसते. नदी पात्रात सापडलेल्या महिलेच्या अर्धवट प्रेताची ओळख पटवणे आणि त्यातील मारेकरी शोधणे हे पोलिसांसाठी आव्हान आहे.