ज्वारीचे नुकसान पंचनामे करून शेतकऱ्यांना मावेजा द्या अन्यथा शिवसेना स्टाईलने महापालिकेत आंदोलन करू

शिवसेना ता संघटक नवनाथ काकडे यांचा इशारा
नांदेड,(प्रतिनिधी)- हसापुर शिवारातून जाणाऱ्या पाईप लाईन मूळे पिकांचे झालेले नुकसान पाहून मनपाने नुकसान भरपाई द्यावी नसता,आम्ही मनपात आंदोलन करू असा इशारा देणारे निवेदन शिवसेना संघटक नवनाथ काकडे यांनी महापूर जयश्री पवाडे यांना दिले आहे.
               मागील अनेक वेळा निवेदनाद्वारे कळवूनही महानगरपालिकेला जाग येईना.नांदेड शहरात पिण्याच्या पाण्यासाठी हस्सापुर शिवारातुन नांदेड शहरांमध्ये पाइपलाइनद्वारे पाणी पुरवठा होत आहे. नसरतपुर रोडच्या मार्गावरील हस्सापुर शिवारात शेतकऱ्यांच्या शेतामध्ये  पाईपलाईन फुटून शेतकऱ्यांच्या ज्वारीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सदर ठिकाणची पाईपलाईन फुटलेली आहे व ती पाईपलाईन तात्काळ जोडण्यात यावी, असे निवेदन मागील महिन्यातील 20 जानेवारी 2022 रोजी दिले होते. परंतु महानगर पालीकेने कोणतीही कारवाई आजपर्यंत केली नाही. त्यामुळे  मोठ्या  प्रमाणात पाणी साचून शेतकऱ्यांच्या ज्वारीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे
                  आज महापौर जयश्री पावडे यांना निवेदन देऊन तात्काळ पंचनाम्याचे आदेश देऊन पंचनामे करून शेतकऱ्यांना मावेजा देण्यात यावा. अन्यथा शिवसेना स्टाईल मध्ये महापालिकेमध्ये नुकसान झालेली  सडलेली ज्वारीचे पिक आयूक्त साहेबांच्या कक्षात जमा करण्यात येईल असे निवेदन शिवसेनेचे तालुका संघटक नवनाथ काकडे यांनी महापौर यांना भेटून दिले.या प्रसंगी शेतकरी गोविंदराव काकडे, पांडुरंग काकडे, शेषेराव काकडे, मारोती काकडे, रावसाहेब काकडे, माधव काकडे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *