नांदेड जिल्ह्यात 24 पोलीस अंमलदारांना मिळाली पदोन्नती

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यातील 24 पोलीस अंमलदारांना त्यांच्या सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्याचे आदेश पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी जारी केले आहेत.
नांदेड जिल्ह्यातील 6 पोलीस हवालदार आता सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक झाले आहेत ते पुढील प्रमाणे आहेत. अनिल महादु पोहरे (विमानतळ), गौतम माणिक कांबळे (मुखेड), शेख आयुब इमामसाब (बिलोली), बालाजी गंगाराम काळे (नायगाव), भानुदास शिवलिंग वडजे (स्थानिक गुन्हे शाखा), ओमप्रकाश पुंडलिकराव घोडगे(विशेष सुरक्षा पथक). जिल्ह्यातील 9 पोलीस नाईक आता पोलीस हवालदार झाल ेआहेत ते पुढील प्रमाणे सुरेश लक्ष्मणराव पुरी (स्थानिक गुन्हे शाखा), रुपसिंग पांडू जाधव (ईस्लापूर), बालाजी शंकरराव मुसांडे(नांदेड ग्रामीण), वसंत रामरामा राठोड(कंधार), चंद्रकांत लक्ष्मण मांडवकर(इतवारा), जयप्रकाश मोतीराम क्षीरसागर(एटीसी), कैलास विठ्ठलराव बोरगावे(जिल्हा विशेष शाखा), विष्णु शंकर डहाळे(पोलीस मुख्यालय), दर्शन शिशुपाल यादव(लाच लुचपत प्रतिबंधक विभाग). जिल्ह्यातील 9 पोलीस शिपाई आता पोलीस नाईक झाले आहेत. ते पुढील प्रमाणे दिपीका दिपक शिंदे (शिवाजीनगर), संतोष पिराजी आकमवाड(विमानतळ), धनश्री आनंदराव गुट्टे (माळाकोळी), मंगल लक्ष्मणराव पवळे आणि अर्चना सदानंद धुरी (पोलीस मुख्यालय), शंकर आशन्ना बिरमवार, उध्दव तानाजी पवार (नांदेड ग्रामीण), दैवशाला लक्ष्मणराव नगरवाड(वजिराबाद), साईनाथ विठ्ठलराव शिंदे कुंटूर असे आहेत.
या सर्वांना त्यांच्या सेवाकाळातील सेवा ज्येष्ठतेनुसार आणि जातीप्रवर्गानुसार ही पदोन्नती देण्यात आली आहे. पदोन्नती प्राप्त सर्व पोलीस अंमलदारांना पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी शुभकामना देवून उत्कृष्ठ कामाची अपेक्षा व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *