नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेच्या गस्त पथकाने 6 मार्चच्या मध्यरात्रीनंतर एक चार चाकी वाहनात धार-धार खंजीर घेवून फिरणाऱ्या व्यक्तीविरुध्द भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
स्थानिक गुन्हा शाखेतील पोलीस उपनिरिक्षक दत्तात्रय काळे, त्यांच्यासोबत पोलीस अंमलदार बाबर, शंकर केंद्रे हे 5 मार्चच्या रात्री 11 वाजता आपल्या कार्यालयातून रात्रीच्या गस्त ड्युटीसाठी निघाले. एका तासानंतर 6 मार्च तारीख सुरू झाली आणि त्यांना खात्रीलायक माहिती मिळाली की, मालेगाव रस्त्यावर एम.एच.02 बी.एम.0348 या गाडीमध्ये बसलेल्या माणसाकडे धार-धार शस्त्र आहे. स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलीस पथकाने त्या माणसास पकडले. त्याचे नाव रामजी साहेबराव ढोले (27) रा.सुमेधनगर नांदेड असे आहे. त्याच्याकडून एक धार-धार खंजीर आणि चार चाकी वाहन असा 50 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी भाग्यनगर पोलीसांनी रामजी ढोले विरुध्द भारतीय हत्यार कायद्याच्या कलम 4,25 नुसार गुन्हा क्रमांक 81/2022 दाखल केला आहे. रामजी ढोलेला अटक करण्यात आली आहे.
धारदार शस्त्रासह चारचाकीत सापडला एक व्यक्ती