स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका वाढणार; अनेक शासकीय अधिकाऱ्यांनी थंडगार श्र्वास घेतला

नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्यमंत्री मंडळात पुढे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका घेण्यासाठी वेळ वाढवून घेण्यात आला. सभागृहाने ही वेळ वाढवून दिली आहे. त्यामुळे ज्या अधिकाऱ्यांवर बदलीची टांगती तलवार लागली होती. त्यांनी सुटकेचा थंडगार श्र्वास घेतला आहे.

महाराष्ट्र राज्य निवडणुक आयोगाने डिसेंबर 2021 मध्येच राज्यात अनेक ठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक होणार याबद्दल माहिती प्रसारित केली होती. त्यानंतर या भागात काम करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांसाठी विविध निकषानुसार संपुर्ण माहिती जमा करून ती प्रत्येक सरकारी विभागातील घटक प्रमुखांनी छाननी करून राज्य निवडणुक आयोगाने विहित केलेल्या अटीनुसार संबंधीत अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे सांगितले होते. त्यामुळे अनेक अधिकाऱ्यांनी आपले देव पाण्यात ठेवले होते.

कालच विधानसभेने निवडणुकांचा वेळ वाढवून घेण्याचा प्रस्ताव मंजुर केला. त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या जाणार हे निश्चित आहे. कांही जणांनी आपल्या उराशी अनेक स्वप्न बाळगून महत प्रयासाने आपल्या नियुक्त्या मिळवल्या होत्या आणि मध्येच त्यांना ती नियुक्ती/सत्ता सोडावी लागणार अशी परिस्थिती तयार झाली होती. त्यामुळे अनेकांना जेवण गोड लागत नव्हते. पण विधानसभेने निवडणुका वेळे वाढवून दिल्याने आता मात्र आपले देव पाण्यातून बाहेर काढून अनेक शासकीय अधिकारी थंडगार श्र्वास घेत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *