नांदेड(प्रतिनिधी)-एका मृत्यूप्रकरणात अगोदर चौकशी करून दोन वर्षानंतर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचे तपासीक अंमलदार अभ्यासू पोलीस निरिक्षक श्री.अशोकरावजी घोरबांड साहेब होते. या प्रकरणात एका मरण पावलेल्या व्यक्तीसह तीन जणांविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यातील एका 63 वर्षीय महिलेला मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथील न्यायमुर्ती एम.जी.शेवलीकर यांनी एका वर्षानंतर जामीन दिला आहे.
मुरारखेडा पंजाब येथील मलकितसिंघ सुरजितसिंघ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गगनदिपसिंघ हा बलवंत कौर बलविंदरसिंघ कालरा या धार्मिक कामकाज करणाऱ्या महिलेच्या संपर्कात आला आणि नांदेडला आला. गगनदिपसिंघने याबाबत आपल्या कुटूंबियांना 1 एप्रिल 2019 रोजी ही माहिती दिली. त्यानंतर त्याचा फोन 5 एप्रिल 2021 पर्यंत बंद होता.गगनदिपसिंघचे कुटूंबिय त्याला शोधण्यासाठी नांदेडला आले. त्याचे मृतदेह सापडल्यानंतर नांदेड ग्रामीण पोलीसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 302, 363, 364, 34 आणि भारतीय हत्यार कायद्याची कलमे 4 आणि 25 नुसार गुन्हा क्रमांक 303/2021 दाखल केला. तपासादरम्यान अभ्यासू पोलीस निरिक्षक अशोकरावजी घोरबांड यांनी हे शोधले की, मयताने बळवंत कौर यांच्याकडून कांही गुप्त माहिती शिकली होती आणि ती काळ्या जादूशी संबंधीत होती. म्हणून आपले गुपीत बाहेर जाईल यासाठी बलवंत कौरने बाबूसिंघ जोरावरसिंघ बासरीवाले याच्यावतीने त्याचा खून करायला लावला. पुढे या प्रकरणी न्यायालयात बलवंत कौर आणि बाबूसिंघ बासरीवाले या दोघांसह मरण पावलेल्या गणेश सारंग स्वामी यांच्याविरुध्द दोषारोपपत्र सादर करण्यात आले. जिल्हा न्यायालयाने नांदेडने बलवंतकौर यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्याविरुध्द उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात 38/2022 हा जामीन अर्ज सादर करण्यात आला.
बलवंतकौर यांचे वकील ऍड. गणेश गाडे यांनी बलवंत कौरला पोलीसांनी अनेकदा नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात बोलावले होते आणि दरवेळेस त्या जात होते. त्या धार्मिक महिला आहेत. यावर विचार करून न्यायालयाने त्यांना जामीन मंजुर करावा असे सांगितले. यावर न्यायामुर्ती शेवलीकर यांनी या प्रकरणातील आरोपी महिला आहेत. न्यायालयात खटला लवकर पुर्ण होणार नाही या सर्व बाबी आपल्या निकालात लिहुन बलवंत कौर यांना जामीन मंजुर करतांना नांदेड सोडून जावू नये, पासपोर्ट जमा करावा अश्या अटी नमुद करून तो जामीन मंजुर केला आहे.
उच्च न्यायालयाने 63 वर्षीय धार्मिक महिलेला खून प्रकरणात जामीन दिला