सोनखेड पोलीस ठाण्यात नवीन अधिकारी

नांदेड.(प्रतिनिधी)- शहरातील इतवारा आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी बदलण्याचे आदेश पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी जारी केले आहेत.शिवाजीनगर पोलीस ठाण्यात काशीकर आणि इतवारा येथे धबडगे यांना पाठवण्यात आले आहे.सोनखेड पोलीस ठाण्यात नवीन सहायक पोलीस निरीक्षक पाठवण्यात आले आहेत.
नांदेड शहरातील पोलीस ठाणे शिवाजीनगर येथील प्रभारी पोलीस निरीक्षक आनंदा नरुटे यांना पोलीस कल्याण विभागात पाठवण्यात आले आहे.त्यांच्या जागी डॉ.नितीन काशीकर यांना नियुक्ती देण्यात आली आहे.इतवारा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक साहेबराव नरवाडे यांना नियंत्रण कक्ष येथे पाठवण्यात आले आहे.त्यांच्या जागी भगवान धबडगे यांची नियुक्ती झाली आहे.
सोनखेड पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक महादेव मांजरमकर यांना आर्थिक गुन्हे शाखेत पाठवण्यात आले आहे.त्यांच्या जागी भाग्यनगर पोलीस ठाण्यात कार्यरत सहायक पोलीस निरीक्षक विशाल भोसले यांना नियुक्ती देण्यात आली आहे.