नांदेड(प्रतिनिधी)-एका ऍटोमध्ये जाणाऱ्या प्रवाशाची लुट करून 27 हजार रुपयांचा ऐवज दरोडेखोरांनी पळविल्याचा प्रकार नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे.
नारायण रघुनाथ घोरबांड रा.उस्माननगर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 7 मार्च रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास ते ऍटो क्रमांक एम.एच.26 एन.3762 मध्ये बसून प्रवास करत असतांना स्मशानभुमिजवळून जात असतांना ऍटोमध्ये बसलेल्या इतर तीन सह प्रवाशांनी त्यांना चाकुचा धाक दाखवून त्यांचा मोबाईल, रोख रक्कम असा एकूण 27 हजार रुपयांचा ऐवज बळजबरीने चोरून नेला आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी याबाबत गुन्हा क्रमांक 133/2022 दाखल केला आहे. त्यात भारतीय दंड संहितेची कलमे 392, 506 आणि 34 जोडण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक श्री अशोकरावजी घोरबांड साहेब यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक आनंद बिचेवार हे करीत आहेत.