नांदेड(प्रतिनिधी)-किनवट येथील एक किराणा दुकान फोडून चोरट्यांनी त्यातून रोख रक्कम आणि कांही सिगारेटचे पॉकिट असा एकूण 22 हजार 330 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. तसेच स्नेहनगर येथील बीएसएनएल विभागाचे ग्राहक सेवा केंद्र तोडून त्यातून 30 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबला आहे.
विजय बालाजी पत्तेवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 7 मार्चच्या रात्री 9 ते 8 मार्चच्या पहाटे 8 वाजेदरम्यान त्यांचे किराणा दुकान फोडून चोरट्यांनी कांही नाणे आणि अनेक प्रकारचे सिगारेट पॉकिट असा एकूण 22 हजार 330 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. किनवट पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस नाईक चौधरी हे करीत आहेत.
श्रीनिवास कट्टे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 6 मार्चच्या रात्री 1 ते 5 वाजेदरम्यान स्नेहनगर येथील बीएसएनएल ग्राहसेवा केंद्र फोडून त्यातून 30 हजार रुपये किंमतीचे संगणक साहित्य चोरट्यांनी चोरले आहे. भाग्यनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून महिला पोलीस अंमलदार मैलवाड अधिक तपास करीत आहेत.