पदोन्नतीच्या विलंबासंदर्भाने राज्य शासनाचे आता जलदगती आणण्यासाठी आदेश

नांदेड(प्रतिनिधी)-20 नोव्हेंबर 2021 रोजी महामहीम राज्यपालांनी महाराष्ट्र शासनाला दिलेल्या एका पत्राच्या अनुशंगाने पदोन्नती देण्याच्या प्रकरणांमध्ये होणारा विलंब उल्लेखीत केला होता. त्यानुसार राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने 9 मार्च 2022 रोजी पदोन्नती प्रस्ताव जलदगतीने निकाली काढण्यासाठी शासन परिपत्रक निर्गमित केले आहे. त्यामुळे आता तरी पदोन्नतीसाठी भांडण्याची वेळ शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर येणार नाही.
राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागातील कार्यासन अधिकारी माधवी संदीप शिंदे यांच्या डिजिटल स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आलेल्या या परिपत्रानुसार विहित वेळापत्रकाचे पालन करणे. कारण अनेक अधिकारी आणि कर्मचारी पदोन्नती प्राप्त होण्याअगोदरच सेवानिवृत्त होतात आणि पदोन्नतीपासून वंचीत राहतात. विभागीय पदोन्नती समितीची बैठक दरवर्षी सप्टेंबर महिन्यात आयोजित करून त्याचा अहवाल तयार व्हावा. पदोन्नतीच्या अनुषंगाने सेवाविषयक बाबींचे आदेश त्या-त्या वेळीत निर्गमित करण्याची दक्षता घेणे. त्यामुळे पदोन्नतीच्या विचारक्षेत्रात असणारे अधिकारी आणि कर्मचारी यांना त्या आदेशाशिवाय पदोन्नती मिळण्यास विलंब होईल. आरक्षणानुसार प्रस्ताव तयार करणे. जे अधिकारी आणि कर्मचारी या कक्षेत येतात. त्यांच्याबाबत स्वयंस्पष्ट अभिप्रायासह प्रस्ताव समितीपुढे सादर करण्याची दक्षता प्रशासकीय विभागांनी घ्यायची आहे. पदोन्नतीसाठी जे निकष आवश्यक आहेत ते निकष कटाक्षाने तपासले जात नाहीत आणि त्यामुळे त्रुटी अभावी पदोन्नती रखडते. यावर लक्ष केंद्रीत करावे. सामान्य प्रशासन विभागास परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा. जेणे करून अद्यावत सेवा जेष्ठता यादी तयार होईल आणि त्यातील क्रमानुसार पदोन्नतीसाठी प्रतिक्षेत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा क्रमांक मागे पडणार नाही. पदोन्नतीचे आदेश विनाविलंब निर्गमित करावेत. कारण बऱ्याचवेळी विलंबाने पदोन्नती आदेश निर्गमित होतात. त्यामुळे भविष्यातील पदोन्नतीसाठी त्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अडचणी येतात. पदोन्नती कक्षेत असणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे गोपनिय अहवाल अनेकदा खुप उशीराने लिहिले जातात आणि त्या एका कारणामुळे पदोन्नती रखडते. म्हणून गोपनिय अहवालांची पुर्तता योग्य वेळी करून घ्यावी. प्रत्येक विभागाने आपल्या विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सेवा जेष्ठता यादी अत्यंत बारकाईने तपासून ती दरवर्षी अद्यावत करावी. जेणे करून पदोन्नती विषयांमध्ये विलंब होणार नाही. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेले हे पदोन्नती संदर्भाचे परिपत्रक संकेतांक क्रमांक 202203091503562007 नुसार राज्य शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *