देगलूर नाका परिसरात जखमी झालेला युवक मरण पावला

इतवारा पोलीसांनी सीसीटीव्ही फुटेज आधारे मारेकऱ्याची ओळख पटविण्यासाठी जनतेला आवाहन
नांदेड(प्रतिनिधी)-9 मार्च रोजी पाठीत खंजीर मारून जखमी केलेला 20 वर्षीय युवक रात्री उपचारादरम्यान मरण पावल्यानंतर पोलीसांनी या प्रकरणात कलम 302 ची वाढ केली आहे आणि पळून जाणाऱ्या आरोपीचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून जनतेला आवाहन केले आहे की, कोणी या व्यक्तीला ओळखत असेल तर त्याबाबत माहिती द्यावी.
काल दि.9 रोजी सकाळी 9 वाजेच्यासुमारास देगलूर नाका परिसरात एक फळ विक्रेता अब्दुल युसूफ कादर (20) हा आपली गाडी घेवून जात असतांना त्याच्या ओळखीच्या भंगार विक्री करणाऱ्याने जुन्या वादाच्या कारणावरून हातातील चाकू अब्दुल युसूफ कादरच्या पाठीत जोरदारपणे मारुन त्यास जमखी करून पळून गेला. इतवारा पेालीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 44/2022 कलम 326 भारतीय दंड संहितेनुसार दाखल केला. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक भगवान धबडगे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक सय्यद महेमुद यांच्याकडे देण्यात आला. उपचारादरम्यान 9 मार्चच्या रात्री जखमी अवस्थेतील अब्दुल युसूफ कादर या युवकाचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलीसांची पळापळ झाली आणि पोलीसांनी या प्रकरणात 302 कलम वाढविण्याचा अर्ज आज न्यायालयात पाठविला आहे.
अब्दुल युसूफ कादरला पाठीत खंजीर खुपसून पळून जाणारा युवक कोणत्या मार्गाने गेला होता. त्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून साक्षीदारांनी सांगितलेल्या वर्णनाचा माणुस शोधून काढला आहे. ज्याने अब्दुल युसूफला चाकू मारला होता. त्या सीसीटीव्ही फुटेजमधील कांही फोटो इतवारा पोलीसांनी वेगवेगळ्या संकेतस्थळांवर पाठवून ओळख पटविण्याचे आवाहन केले आहे. इतवाराचे पोलीस निरिक्षक भगवान यांनी जनतेला आवाहन केले आहे की, सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीला कोणी ओळखत असेल तर त्याची माहिती पोलीस ठाणे इतवारा येथे द्यावी किंवा माझा मोबाईल क्रमंाक 9552520363 वर सुध्दा माहिती द्यावी आणि एका मारेकऱ्याला जेरबंद करण्यात पोलीसांची मदत करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *