नांदेड(प्रतिनिधी)-अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत, प्रथम स्वतंत्रता सेनानी, राष्ट्रीय वीर शिरोमणी, हिंदुसूर्य, मेवाड नरेश महाराणा प्रतापसिंहजी यांची जयंती महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णयात त्यांचे नाव महापुरूष यादीत आहे.महाराष्ट्रच्या सर्वत्र शाळा महाविद्यालय, शासकीय, प्रशासकीय कार्यालयांमध्ये त्यांची जयंती साजरी करावी असे शासनाचे आदेश आहेत. मात्र काही ठिकाणी असेे दिसत नाही. महाराणा प्रतापसिंहजी यांच्या गौरवशाली इतिहासाची आजच्या नवीन तरुण युवा पीढीला माहिती व्हावी व त्यांची जयंती सर्वत्र साजरी व्हावी. यासाठी युवा राजपुताना ग्रुप व समस्त हिंदु प्रेमीतर्फे नांदेड सिडको हडको व शहरातील सर्व शाळा, कॉलेज, महाविद्यालय,शासकीय प्रशासकीय कार्यालयमध्ये त्यांची प्रतिमा वाटप करण्यात आली.
यावेळी उपस्थित करणसिंह ठाकूर, उद्योजक प्रकाशसिंह परदेशी, सौ सुषमा ठाकूर, अमर बैस, गोविंदसिंह ठाकूर, प्रेमसिंह ठाकूर,गजाननसिंह चंदेल, नीरजसिंह तंवर,कन्हैया ठाकूर, गजानन कछवे, ओमसिंह ठाकूर, मयूर ठाकूर, बालाजीसिंह ठाकूर, शुभम गोपीनवार,शांतनू कछवे, सचिन वानोळे आदीची उपस्थिती होती.
युवा राजपुताना ग्रुप सिडकोच्यावतीने शासकीय कार्यालयात महाराणा प्रतापसिंहजी यांच्या प्रतिमा वाटप