अधिस्विकृती नसतांना ज्येष्ठ झालेल्यांचे काय ?
नांदेड(प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांना दरमहा 11 हजार रुपये इतके अर्थ सहाय्य देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव अ.भि.मोरये यांच्या डिजिटल स्वाक्षरीने हा शासन निर्णय प्रसिध्द झाला आहे. पण यासाठी लागणारी कागदपत्रे प्रत्येक ज्येष्ठ पत्रकाराकडे आहे की, नाही हा सर्वात मोठा प्रश्न आहे. अनेक बोरु बहादरांनी आपणच सर्वात बहादर पत्रकार आहोत असे सांगून शासनाच्या अनेक योजनांची लुट केलेली आहे. त्याबाबत या शासन निर्णयात कांही एक उल्लेख नाही.
राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेल्या अधिस्विकृती धारक पत्रकारांना व त्यांच्या कुटूंबियांना वैद्यकीय उपचारात आर्थिक मदत देण्याकरीता डॉ.शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी या विश्र्वस्त संस्थेची स्थापना 1 ऑगस्ट 2009 रोजी केली. या विश्र्वस्त संस्थेत 10 कोटी रुपयांचा निधी सन 2019 अन्वये बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना लागू करण्यास शासनाची प्रशासकीय मान्यता देण्यात आली. तसेच सन 2018-19 मध्ये 15 कोटी, 2021-22 मध्ये 10 कोटी असे 35 कोटी रुपये मुंबई येथील इंडियन बॅंक नरीमन पॉईंट येथे मुदत ठेव स्वरुपात ठेवण्यात आले आहे. राज्यातील पत्रकार सन्मान योजनेअंतर्गत पत्रकारांना या योजनेनुसार 11 हजार दरमहा देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे.
पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असल्याने या घटकाला सामाजिक सुरक्षा आणि सुविधा देण्याचा विचार करून ज्येष्ठ पत्रकारांप्रती आधार भाव, कृतज्ञता आणि वृध्दाप अवस्थेत त्यांची हेळसांड होवू नये म्हणून तसेच त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेअंतर्गत ज्येष्ठ पत्रकारांना दरमहा 11 हजार ऐवढे आर्थ सहाय्य देण्यात येणार आहे. शासनाचा हा निर्णय संकेतांक क्रमांक 202203101621286207 नुसार शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केला आहे.
शासनाच्या अनेक योजनांचा फायदा अनेक बोरुबहाद्दरांनी या राज्यातील सर्वोत्कृष्ट पत्रकार आहोत असे दाखवून घेतलेला आहे. काल-परवाच पंढरपुर शहरात साहित्यीक आणि पत्रकार एम.जी. भगत हे मदत आणि उपचाराविना रस्त्यावर याचना करत होते. त्यांना रॉबीन हुड आर्मी या सामाजिक संस्थेने मदत केली. महाराष्ट्रात आम्हीच पत्रकारांचे नेते आहोत असे म्हणणाऱ्या बोरु बहाद्दरांना रस्त्यावर मदतीची याचना करणारे साहित्यक आणि ज्येष्ठ पत्रकार दिसले नाहीत. आता शासनाने हा निर्णय जाहीर केल्याने आमच्यामुळेच हा निर्णय झाला असे म्हणणारे बोरुबहाद्दर बरेच तयार होतील आणि या योजनेचा फायदा सुध्दा तेच मिळवतील. कारण अधिस्विकृतीधारक पत्रकार असणे या योजनेसाठी आवश्यक आहे. अधिस्विकृती जेथून मंजुर होते. तेथे असणारे अनेक बोरुबहाद्दरांनी अधिस्विकृतीच्या मागणीसाठी आलेल्या अनेक पत्रकारांना अधिस्विकृती नाकारलेली आहे. मग आज जे ज्येष्ठ झाले आहेत. त्यांच्याकडे अस्विकृतीच नाही तर मग त्यांना योजनेचा लाभ कसा मिळेल. यावर सुध्दा शासनाने विचार करण्याची गरज आहे.
ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान करण्यासाठी शासन देणार 11 हजार दरमहा