स्थानिक गुन्हे शाखा, विशेष शाखा येथील कालावधी 3 वर्षाचा; स्व जिल्ह्यात कार्यरत अधिकाऱ्यांबाबत उल्लेख नाही
नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस महासंचालक कार्यालयातील अपर पोलीस महासंचालक संजीव कुमार सिंघल यांनी येत्या सार्वत्रिक बदल्यांसाठी पोलीस अधिकाऱ्यांची माहिती राज्यातील प्रत्येक घटक प्रमुखाने पाठविण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये स्थानिक गुन्हे शाखा येथील नियुक्ती तीन वर्षाची असते हे सुध्दा नमुद केले आहे.
पोलीस महासंचालक कार्यालयाने राज्यातील पोलीस निरिक्षक सहाय्यक पोलीस निरिक्षक आणि पोलीस उपनिरिक्षक यांच्या सार्वत्रिक बदल्या 2022 साठी राज्यातील प्रत्येक घटकप्रमुखाकडून माहिती मागवली आहे. यामध्ये सर्वप्रथम तीनही पदाच्या पोलीस अधिकाऱ्यांचे सामान्य पदावधी काल पोलीस ठाणे किंवा शाखा येथे दोन वर्ष नमुद केले आहे. एखाद्या जिल्ह्यात चार वर्ष आणि परिक्षेत्रात 8 वर्ष इतका झालेला असेल. तथापी जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखा व विशेष शाखा तसेच आयुक्तालयातील गुन्हे शाखा व विशेष शाखा यांच्या करीता सामान्य पदावधी तीन वर्ष निश्चित करण्यात आलेला आहे. मुंबई पोलीस आयुक्तालयातील तीन ही पदाच्या पोलीस अधिकाऱ्यांचा पदावधी कार्यकाळ 8 वर्ष आणि इतर पोलीस आयुक्तालयातील 6 वर्ष आणि विशेषीकृत अभिकरणामधील सामान्य पदावधी 3 वर्ष इतका निश्चित करण्यात आला आहे.
सर्वसाधारण बदल्या 2022 मध्ये तीन प्रकार मोडतात. त्यात विहित कालावधी पुर्ण झालेले अधिकारी, विहित कालावधी पुर्ण परंतू मुदत पुर्व बदलीसाठी सादर केलेली विनंती आणि प्रतिकुल अहवालावरून बदली करावयाचे अधिकारी अशा तीन स्वरुपात या बदल्या होणार आहेत. जात पडताळणी समिती, बॉम्बशोधक नाशक पथक, अनुसूचित जमातील प्रमाणपत्र तपासणी समिती, राज्य मानवी हक्क आयोग, कारागृह, नक्षलवाद विरोधी पथक, पोलीस महासंचालक कार्यालय, आर्थिक गुन्हे शाखा, महिला प्रतिबंधक अत्याचार प्रतिबंधक विभाग आदींसाठी दोनवर्षाचा कालावधी निश्चित केला आहे. या तीन पदांच्या अधिकाऱ्यांना एका जिल्ह्यात चार वर्ष कालावधी पुर्ण केला असेल परंतू परिक्षेत्र 8 वर्ष इतका कालावधी पुर्ण केला नसेल अशा अधिकाऱ्यांच्या बदल्या परिक्षेत्रीय आस्थपना मंडळाने सर्वसाधारण बदल्या 2022 चे आदेश पोलीस महासंचालक कार्यालयातून निर्गमित झाल्यानंतर करायच्या आहेत.
ज्यांनी मुदतपुर्व विनंती बदली केली आहे. त्यांच्या सर्व कागदपत्रांची तपासणी घटकप्रमुखांनी करून त्यातील सत्यता तपासून अभिप्रायासह तो अहवाल पोलीस महासंचालकांना पाठवायचा आहे. या परिपत्रकापुर्वी पाठवलेले सर्व विनंती अर्ज समाप्त झाले आहेत. या तीन ही पदातील अधिकाऱ्यांच्या बदल्या प्रतिकुल अहवालामुळे करायच्या आहेत. त्याबाबतचा सविस्तर अहवाल पोलीस घटकप्रमुखांनी पाठवायचा आहे. 31 मार्च 2022 नंतर आलेल्या कोणत्याही अर्जाचा विचार होणार नाही याची दक्षता घटकप्रमुखांनी घ्यायची आहे. यासोबत तीनही पदांच्या अधिकाऱ्यांचे स्वतंत्र परिशिष्ट तयार करून कशा पध्दतीने ते भरायचे आहेत. याची सुलभ मांडणी पोलीस महासंचालक कार्यालयाने केली असून ती प्रत्येक घटक प्रमुखाला पाठवलेली आहे.
स्व जिल्ह्यात कार्यरत अधिकाऱ्यांबदल कांही एक शब्द नाही
पोलीस महासंचालक कार्यालयाने पोलीस निरिक्षक, सहाय्यक पोलीस निरिक्षक, पोलीस उपनिरिक्षक या पदावर कार्यरत असंख्य अधिकारी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात त्यांच्या स्वत:चा जिल्हा असतांना कार्यरत आहेत. स्वत:चा जिल्हा असणाऱ्या अधिकाऱ्यांबाबत काय निर्णय घ्यावा याबाबत कोणताही उल्लेख या परिपत्रकात पोलीस महासंचालक कार्यालयाने केलेला नाही.
पोलीस अधिकाऱ्यांच्या सार्वत्रिक बदल्या 2022 साठी महासंचालक कार्यालयाने माहिती मागवली