नांदेड(प्रतिनिधी)-एका प्राध्यापिकेचे घरफोडून चोरट्यांनी हर्षनगर भागातून 4 लाख 44 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार 10 मार्च रोजी सकाळी 8 ते दुपारी 3 वाजेदरम्यान घडला आहे.
प्रा.रत्नमाला धारबा धुळे (वानखेडे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.10 मार्चच्या सकाळी 8 ते दुपारी 3.30 वाजेदरम्यान कोणी तरी त्यांच्या घराच्या मुख्य दरवाज्याचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि घरातील लोखंडी कपाट फोडून त्यात ठेवलेली रोख रक्कम आणि सोन्याचे दागिणे असा 4 लाख 44 हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे. विमानतळ पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 79/2022 कलम 454, 380 भारतीय दंड संहितेनुसार दाखल केला आहे. या एकूण 4 लाख 44 हजार रुपयांच्या ऐवजामध्ये 90 हजार रुपये रोख रक्कम दोन तोळे सोन्याचे जुने गंठण 60 हजार रुपयांचे, 3 तोळ्यांचे सोन्याचे गंठण 90 हजार रुपयांचे, 3 तोळ्याची सोन्याची चैन 90 हजार रुपयांचे कानातील टॉप्स प्रत्येकी 3 ग्रॅम वजनाचे 6 जोड किंमत 54 हजार रुपये, 2 तोळे वजन असलेले सोन्याचे गोट 60 हजार रुपये किंमतीचे चोरट्यांनी चोरून नेले आहेत. विमानतळ पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरिक्षक शेख जावेद या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.
प्राध्यापिकेचे घरफोडून 4 लाख 44 हजारांचा ऐवज लंपास