नांदेड(प्रतिनिधी)-कोविड महामारीमध्ये मरण पावलेल्या एका पोलीस पाटील यांच्या कुटूंबियांना पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांच्या हस्ते 50 लाखांचा धनादेश देण्यात आला.
कोविड महामारीमध्ये मरण पावलेल्या लोकांना शासनाने 50 लाख रुपये देण्याची योजना जाहीर केली होती. त्यानुसार इब्राहिमपुर ता.देगलूर येथील पोलीस पाटील गंगाधर व्यंकटराव इंगळे यांचा मृत्यू झाला होता. त्यात राज्य शासनाने त्यांच्यासाठी 50 लाखांचा निधी मंजुर केला होता. तो 50 लाखांचा धनादेश पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांच्या हस्ते पोलीस पाटील यांच्या पत्नी अनुसया गंगाधर इंगळे यांना देण्यात आला.
याप्रसंगी पोलीस मुख्यालयाच्या पोलीस उपअधिक्षक डॉ.अश्र्विनी जगताप, शहर वाहतुक शाखेचे पोलीस निरिक्षक प्रशांत देशपांडे, पोलीस कल्याण विभागाचे आनंदा नरुटे, जनसंपर्क अधिकारी शिवाजी लष्करे आणि या प्रक्रियेची संपुर्ण जबाबदारी सांभाळणारे कनिष्ठ श्रेणी लिपीक नरेंद्र नाथराव कुलकर्णी उपस्थित होते.