नविन नांदेड(प्रतिनिधी)-बळीरामपूर ता.नांदेड येथे जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने वृक्षारोपण करून पर्यावरण चे जतन करावे असे आवाहन रयत सेवाभावी संस्थेचे संचालक तथा उमेद अभियानाचे तालुका व्यवस्थापक प्रा.इरवंत सुर्यकार यांनी केल.
यावेळी उपस्थित प्रभाग समन्वयक ईश्वर आडे , भरारी महिला ग्रामसंघाच्या अध्यक्षा गंगाबाई भोळे, प्रतिभा जाधव,निर्मला शिंदे, समूह संसाधन व्यक्ती वर्षा गुंडले, प्रियंका वाठोरे, आदी महिला बचत गटाच्या सदस्या उपस्थित होते.
जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने मौजे बळीरामपूर येथे वृक्षारोपण.