नांदेड,(प्रतिनिधी)- ‘गाण्यांची अंगत-पंगत’या कार्यक्रमाच्या रसिक सदस्य आणि श्री माणिक गुमटे यांच्या सुविद्य पत्नी सौ. मधुमती गुमटे यांचे नुकतेच ह्र्दय विकाराच्या धक्क्याने दु:खद निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 62 वर्षांचे होते. मालेगाव रोडवरच्या भवितव्य नगर येथे रहाणार्या मधुमती गुमटे म्हणजे गुमटे परिवार आणि सर्व नात्यांतले एक हसमुख आणि रसिक असे व्यक्तीमत्त्व होते. आजाराला व्यवस्थित तोंड देऊन त्यांची प्रकृती चांगली झालेली असताना हा दु:खद प्रसंग गुमटे परिवारावर ओढवला. सिने संगीत मधुमती यांचा आवडीचा विषय होता. गाण्यांची अंगत-पंगतच्या वतीने नुकताच साजर्या झालेल्या कार्यक्रमात त्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमात त्यांनी गाण्याच्या निमित्ताने निवेदनेही केलेली होती. आपले पती माणिक गुमटे यांच्या प्रत्येक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. त्यांच्या मागे पती माणिक गुमटे, दोन कन्या सौ. रश्मी, सौ.मेघना आणि जावई कुणाल, तुषार यंदे आणि आप्तेष्ट परिवार आहे.
Related Posts
शिवाजीनगर गुन्हे शोध पथकाने 8 लाख रुपये किंमतीच्या चोरीच्या 12 दुचाकी जप्त केल्या
नांदेड(प्रतिनिधी)-शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने एका चोरट्याला पकडून त्याच्याकडून चोरीच्या 8 लाख रुपये किंमतीच्या 12 दुचाकी गाड्या जप्त केल्या…
म्हणून पश्चिम महाराष्ट्र आपल्या पुढे आहे – प्रल्हाद इंगोले
नांदेड -राज्याच्या सर्व भागापेक्षा पश्चिम महाराष्ट्र हा सर्वात विकसित विभाग असून त्या तुलनेत मराठवाडा विदर्भ हे खूप मागे आहेत याबाबत…
25 वर्षीय युवकाचा खून करणारा 20 वर्षीय युवक पोलीस कोठडीत
नांदेड(प्रतिनिधी)-22 फेबु्रवारीला जखमी झालेला युवक मरण पावल्यानंतर खूनाची तक्रार देण्यात आली. खून करणाऱ्या युवकाला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी 10 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत…