नांदेड(प्रतिनिधी)-तलवारीची भिती दाखवून एका व्यक्तीकडून हजार रुपये खंडणी घेणाऱ्या दोन जणांपैकी एकाला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम. बी.कुलकर्णी यांनी दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
दि.14 मार्च रोजी लातूर फाटा येथील प्रशांत संजय गवाले हे आपली बहिण आणि मावशी यांना घेवून सायंकाळी 6 वाजता कॅन्सर हॉस्पीटलकडून निघाले आणि घरी आले. त्यावेळी त्यांचा पाठलाग करत दोन जण आले आणि त्यांनी तुझ्या घरात काय चालते आम्हाला सर्व माहित आले असे सांगून आपल्या जवळच्या तलवारीच्या धाकावर प्रशांत गवालेकडून 1 हजार रुपये काढून घेतले. नांदेड ग्रामीण पेालीसांनी या प्रकरणी तेजपालसिंघ कुलवंतसिंघ चाहेल (28) रा.जुना कौठा आणि सेेंटीस माने (20) रा.जुना कौठा नांदेड या दोघांविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 386, 506, 34 आणि भारतीय हत्यार कायद्याच्या कलम 3/25 नुसार गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास तोंडी आदेशावर नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनचा कारभार सांभाळणारे पोलीस निरिक्षक माननिय श्री अशोकरावजी घोरबांड साहेब यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक सुरेश थोरात यांच्याकडे देण्यात आला आहे.
आज दि.15 मार्च रोजी सहाय्यक पोलीस निरिक्षक सुरेश थोरात, पोलीस अंमलदार शेख रब्बानी, गीते यांनी तेजपालसिंघ कुलवंतसिंघ चाहेलला न्यायालयात हजर केले आणि पोलीस कोठडी मागितली ती न्यालयाने दोन दिवसांसाठी मंजुर केली आहे.
खंडणी वसूल करणाऱ्याला दोन दिवस पोलीस कोठडी