नांदेड(प्रतिनिधी)-एका पेट्रोल पंपातील जवळपास दहा लाख रुपये रोख रक्कम बॅंकेत भरण्यासाठी जाणाऱ्या व्यक्तीला लुटण्याचा प्रयत्न झाला. पण सुदैवाने पैसे सुरक्षीत राहिले.
दि.14 मार्च रोजी सकाळी 10 वाजेच्यासुमारास दादाराव अशोक डाके हे त्यांच्या जवळ असलेली 9 लाख 54 हजार 220 रुपये एवढी रक्कम घेवून मालेगाव येथील स्टेट बॅंकेकडे जात असतांना धामदरी पाटी जवळ त्यांच्या पाठीमागून आलेल्या दुचाकी गाडी क्रमांक एच.38 ए.सी.0893 यावर बसलेल्या तीन चोरट्यांनी आपल्या तोंडाला कपडे बांधलेले होते. दादाराव डाकेच्या दुचाकीला लाथ मारून त्यांना खाली पाडण्याचा प्रयत्न केला. पण सुदैवाने ते खाली पडले नाहीत आणि जवळपास 10 लाखांची रक्कम वाचली. अर्धापूर पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 60/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 393 नुसार दाखल केला आहे त्या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक साईनाथ सुरवसे यांच्याकडे देण्यात आला आहे. दादाराव डाकेला लुटण्यासाठी आलेल्या, फिर्यादीत क्रमांक लिहिलेल्या दुचाकी गाडीबद्दल इंटरनेटवर माहिती घेतली असता ही दुचाकी गाडी बजाज पल्सर आहे. या गाडीच्या मालकाचे नाव सर्जेराव होलपाडे असे दिसत आहे.
सुदैवाने जवळपास 10 लाख रुपयांची रोकड दरोडेखोरांपासून वाचली