
नांदेड(प्रतिनिधी)- नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेवर मागील असंख्य वर्षांपासून कॉंग्रेसची एक हाती सत्ता आहे. नेते मंडळी सत्ता मिळवतांना आम्ही गरीबांचे वाली आहोत असे सांगतात. नांदेड शहरात रस्त्यावर दुकाने लावून आपली उपजिवीका चालविणाऱ्या हजारो लोकांवर टाकले जाणाऱ्या दरोड्यांची नोंद कोठेच घेतली जात नाही आणि महानगरपालिकेतील अधिकारी तसेच पदाधिकारी आम्ही किती मेहनत करून काम करत आहोत असे दाखवतात. भारतीय प्रगल्भ लोकशाहीचे यापेक्षा मोठे दुर्देव काय?
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेवर असंख्य वर्षांपासून कॉंगे्रसची एक हाती सत्ता आहे. सर्वसामान्य माणसाच्या भल्यासाठी, गरीबांच्या हक्क रक्षणासाठी आम्ही जाणीवपुर्वक प्रयत्न करतोत असे नेहमीच सांगितले जाते. तरी सुध्दा शहरामध्ये असंख्य समस्या आहेत. कोणाला भरपूर सुविधा आहेत तर कोणाला दोनवेळचे जेवण मिळणे सुध्दा दुरापास्त आहे हे सुध्दा याच शहराचे चित्र आहे. शहरात श्रीमंत व्यक्ती आहेत, मध्यमवर्गीय आहेत आणि गरीब आहेत. गरीबांच्या खाली सुध्दा दारीद्रय रेषेखाली जगणारी मंडळी आहे. श्रीमंतांसाठी काही केले तर काय आणि नाही केले तर काय त्यांना कधीच फरक पडत नाही. मध्यमवर्गीय मी खालच्या स्तराचा नाही हे दाखविण्यात आपली शक्ती खर्च करत असतात. प्रश्न आहे फक्त गरीब आणि दारिद्रय रेषेखाली जगणाऱ्या व्यक्तींचा त्यांना आपले आणि आपल्या कुटूंबाचे भरण पोषण करण्यासाठी भरपूर मेहनत घ्यावी लागते. त्यातील कांही कामगार आहेत. कांही छोटे-छोटे व्यवसायकी आहेत.

आजच्या परिस्थितीत नांदेड शहरातील दुकानांची किंमत किंवा त्या दुकांनाचे भाडे अत्यंत उच्च दरात आहेत. त्यामुळे गरीब लोकांना अशी दुकाने खरेदी करून किंवा किरायाने घेवून आपला व्यवसाय चालविणे हा एक मोठा यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर असतो. त्यातूनच हातगाडे, छोट्या-छोट्या दुकानांच्या कल्पना पुढे आल्या आणि ही मंडळी अशा व्यवसायाच्या माध्यमातून आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी दिवसरात्र घाम गाळत असतात. महानगरपालिकेचा रस्ता, महानगरपालिकेचा पादचारी पाथ पाहिला तर जवळपास 90 टक्के जागेवर अशा लोकांचे व्यवसाय आहेत. कांही लोकांची दुकाने आहेत पण समोरचा पादचारी पाथ त्यांनी अतिक्रमण करून त्यावर सुध्दा आपले दुकान थाटले आहे. आपल्या संपत्तीमध्ये अशा व्यवसायीकांवर कार्यवाही करण्यासाठी एक मोठी यंत्रणा अतिक्रमण पथक नावावर महानगरपालिकेत कार्यान्वीत आहे.
महानगरपालिकेच्या नावाचा मोठा आधार, शासकीय कामात अडथळा आणणे हा भारतीय दंड संहितेतील अधिकार या महानगरपालिकेतील अतिक्रमण पथकाला आहे. त्या आधारावर ते चुकीच्या जागी व्यवसाय करणाऱ्याविरुध्द कायदेशीर कार्यवाही करू शकतात. नांदेड शहरात असे अनेक पादचारी रस्ते आहेत. त्यावर व्यावसायकीकांशिवाय दुसरा कोणी पायी चालूच शकत नाही. त्यांच्या दुकानात येणारा ग्राहकच तेथे जातो. आपला आणि आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी ही मंडळी मेहनत करून मिळवत असलेल्या उत्पन्नावर महानगरपालिकेचे कांही अधिकारी आणि कर्मचारी दरमहिन्याला दरोडा टाकतात. कोणाकडून 1 हजार रुपये महिना, कोणाकडून 2 हजार रुपये महिना असा या दरोड्याचा प्रकार आहे. रस्त्यावरून आपला व्यवसाय उचलला गेला तर त्यातील साहित्य परत देण्यासाठी पुन्हा दरोडा टाकला जातो. कोणत्याही प्रकारची पावती या लोकांना दिली जात नाही आणि हा दरोड्याचा कारभार नेहमीच सुरू आहे. कशाला तरी आम्ही कोणत्या कामावर जगतो आहोत हे दाखवता. त्या मंडळीच्या एकूण उत्पन्नामधून हजार दोन हजार रुपये जात असतील तरीपण ते महानगरपालिकेबद्दल वापर असणारे शब्द सुध्दा महत्वपूर्ण आहेत. ते शब्द ऐकूण आपल्याला मोठे पणा मानणाऱ्या व्यक्तींनी कधी तरी त्या शब्दातील मतीतार्थाला ओळखण्याची गरज आहे तरच त्या शब्दांचे महत्व कळेल.
या लोकांवर दरोडे टाकून आपल्या घरी अन्न-पाणी आणणे, आपल्या लेकरांच्या हौसी पुरविणे हिच कामे चालत असतील ना.खरे तर यात किती आनंद आहे हे नक्कीच पीएचडी पदवी प्राप्त करण्यासारखा विषय आहे. व्यावसायीकांसाठी जागा उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी सुध्दा महानगरपालिकेचीच आहे. ती जबाबदारी न स्विकारता फक्त दरोडे टाकून आपल्या घरात सुख वस्तु आणण्याच्या नादात लागलेल्यांनी त्या मागे श्राप सुध्दा असते याचाही विचार कधी करावा. ही बातमी लिहिण्यामागे, तिला प्रसिध्द करण्यामागे आमचे व्यावसायीकांशी शत्रुत्व नाही. त्यांच्यामुळेच आम्हाला खुप दुर न जाता वस्तु उपलब्ध होतात. परंतु त्यांच्या उत्पन्नावर दरोडा टाकणाऱ्यांना उघड पाडण्यासाठीच आम्ही हा प्रपंच केला आहे.
