नांदेड(प्रतिनिधी)-वडीलोपार्जित जमीनीची नोंद वारसा हक्कात घेतांना त्यासाठी मला आणि माझ्या वरिष्ठांंना देण्यासाठी ३० हजार रुपये लाच मागणी करणार्या महिला तलाठ्याविरुध्द भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१५ जानेवारी २०२२ रोजी मौजे चिखली ता.जि.नांदेड येथील एका तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली की, चिखली येथील तलाठी सोनाली काकडे यांच्याकडे त्यांच्या वडिलोपार्जित जमीनीची नोंद वारसा हक्कात करण्यासाठी अर्ज दिला. त्यावर कार्यवाही न करता तलाठी सोनाली काकडे यांनी तक्रारदाराकडे मला आणि माझ्या वरिष्ठांना देण्याकरीता ३० हजार रुपये लाच मागणी करीत आहेत असा मजकुर होता. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने १७ जानेवारी २०२२ रोजी पंचासमक्ष लाच मागणी केल्याची बाब निष्पन्न झाली. पण त्या दिवशी त्यांनी पैसे स्विकारले नाहीत. या बाबत आता तलाठी सोनाली काकडे यांच्याविरुध्द भाग्यनगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

ही सर्व कार्यवाही पोलीस अधिक्षक डॉ.राहुल खाडे, अपर पोलीस अधिक्षक धरमसिंग चव्हाण, पोलीस उपअधिक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक अरविंद हिंगोले, एकनाथ गंगातीर, जगन्नाथ अनंतवार, शेख मुजीब, ईश्वर जाधव आणि आशा गायकवाड यांनी पार पाडली.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ही माहिती देतांना जनतेला आवाहन केले आहे की, कोणी शासकीय अधिकारी, कर्मचारी, शासकीय काम करण्यासाठी लाचेची मागणी करीत असेल तसेच त्याच्या लाच मागणीचे मोबाईल फोनवर बोलणे असेल,ऑडीओ, व्हिडीओ असेल, एसएमएस असतील तसेच भ्रष्टाचार संबंधाने कांही माहिती असेल तसेच माहिती अधिकारात शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी शासकीय निधीचा भ्रष्टाचार केल्याची माहिती प्राप्त झाली असेल तर याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा. त्यासाठी टोल फ्रि क्रमांक 1064(2), कार्यालयाचा फोन क्रमांक 02426-253512 यावर आणि पोलीस उपअधिक्षक राजेंद्र पाटील यांचा मोबाईल क्रमांक 7350197197 सुध्दा माहिती देता येईल तसेच एसीबी विभागाच्या शासकीय संकेतस्थळावर, मोबाईल ऍपवर आणि फेसबुक पेजवर सुध्दा याची माहिती देता येईल जनतेने भ्रष्टाचार रोखण्यासाठी ही माहिती द्यावी असे आवाहन एसीबी विभागाने केले आहे.