नांदेड,(प्रतिनिधी)- पतीने पत्नीच्या चारित्र्या वर संशय घेवून कुर् हाडीचे घाव घालून खून केल्याचा प्रकार किनवट तालुक्यात पारडी (खु) गावात आज सकाळी उघडकीस आला आहे.किनवट पोलीसांनी मारेकरी पतीस अटक केली आहे.
शंकर हनुवता राजुलवाड यांनी दिलेल्या तक्रारी नूसार शामसुंदर भाउराव धमेवाड वय 28 याने आपली पत्नी चंद्रकला वय 25 हिच्या चारित्र्यावर संशय घेवून कुर् हाडीच्या मदतीने तीच्या शरीरावर अनेक घाव घालून तीचा खून केला आहे. हा प्रकार आज दिनांक 19 मार्च रोजी सकाळी घडला आहे.
घटनेची माहिती मिळताच किनवटचे पोलीस निरिक्षक अभिमन्यू साळूंखे आणि त्यांचे अनेक सहकारी पारडी गावात पोहचले. घटनेची सखोल तपासनी करुन पोलीसांनी मारेकरी पती शामसुंदर भाऊराव धमेवाड यास अटक केली आणि त्याच्या विरुध्द पत्नीचा खून केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उप अधिक्षक विजय डोंगरे,पोलीस निरिक्षक अभिमन्यू साळूंखे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उप निरिक्षक सावंत अधिक तपास करीत आहेत.