नांदेड(प्रतिनिधी)-अंध विद्यालयातील बालकांसोबत वेगवेगळ्या रंगांच्या फुलांनी होळी साजरी करून कपील यादव मित्र मंडळाने एक आगळा वेगळा आनंद घेतला.
वसरणी येथील निवासी अंध विद्यालयात जवळपास 40 ते 45 अंध बालकांसोबत कपील यादव मित्र मंडळाने विविध रंगांच्या फुलांसोबत होळी खेळून आनंद साजरा केला. मुलांसोबत सर्वांनी वेगवेगळ्या व्यंजनांचे भोजन घेतले आणि त्यानंतर त्या बालकांसाठी आणलेल्या कांही दैनंदिन गरजेच्या वस्तू त्यांना देण्यात आल्या. यानंतर विविध रंगांची फुले उधळून या ठिकाणी धुळवडीचा सण साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात ऍड. दिलीप ठाकूर आणि सामाजिक कार्यकर्ते बिरबल यादव यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी धनंजय जावळे, आनंद बामलवा, राजेश यादव, दत्ता गव्हाणे, कैलास बरंडवाल, संतोष यादव, कैलास भगत, सोमनाथ यादव, कपील लोंडे, राहुल बनसोडे, गजानन भगत, सुशांत यादव, शुभम यादव, गणेश बिरकुरे, हिरा चौधरी, अमोल देवके, पियुश आहिर यांनी परिश्रम घेतले.
अंध विद्यालयात फुलांसोबत होळी खेळून साजरा केला होळी सण