नांदेड(प्रतिनिधी)- पावडेवाडी नाका ते काबरानगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर 20 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता एका महिलेचे सोन्याचे गंठन तोडून चोरट्यांनी पळ काढला आहे.
वैशाली दिगंबर स्वामी या महिला 20 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता आपल्या दुचाकीगाडीवर बसून पावडेवाडी नाका ते काबरानगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर प्रवास करीत होत्या. त्या आपल्या घराकडे जात होत्या. आशा हॉस्पीटलसमोरून त्या पुढे जात असतांना त्यांच्या पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील दीड तोळे वजनाचे सोन्याचे गंठण किंमत 60 हजार रुपयांचे बळजबरीने हिसकावून पळून गेले आहेत. भाग्यनगर पोलीसांनी याबाबत गुन्हा क्रमांक 98/2022 दाखल केला असून तपास पोलीस उपनिरिक्षक नवाज शेख यांच्याकडे देण्यात आला आहे.
दुचाकीवर जाणाऱ्या महिलेचे गंठण तोडले