नांदेड,(प्रतिनिधी)- पोलीस अधीक्षक कार्यालयात महाराणा प्रतापसिंह जयंती साजरी करतांना पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी राणांच्या इतिहासाला वाचले तेव्हा राणा कळले.तेव्हा सर्वानी महाराणा प्रताप यांच्या इतिहासाचा अभ्यास करावा.
आज महाराणा प्रतापसिंह जयंती दिनी पोलीस अधीक्षक कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.या प्रसंगी आपल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रमोद शेवाळे यांनी सांगितले की, महाराणा प्रतापसिंह यांच्या इतिहासाचे वाचन केल्यावर आपल्याला कळते की,त्यांनी किती त्याग करून आमच्यासाठी स्वातंत्र्याचा मार्ग तयार करून दिला आहे.या प्रसंगी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर,जनसंपर्क विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी लष्करे,नियंत्रण कक्षातील पोलीस उप निरीक्षक सय्यद नूर,जनसंपर्क विभागातील पोलीस अमंलदार उत्तम वाघमारे,रेखा इंगळे यांच्यासह अनेक अधिकारी आणि मंत्रालयीन कर्मचारी उपस्थित होते.