नांदेड(प्रतिनिधी)-गजेंद्र उर्फ गज्जू उर्फ बाल्टी ठाकूरचा खून करणाऱ्या तीन जणांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम.बी.कुलकर्णी यांनी चार दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
21 मार्च रोजी एका अनोळखी युवकाचा मृत्यूदेह वसरणी नाल्यात सापडला होता. त्याची ओळख गजेंद्र उर्फ गज्जू उर्फ बाल्टी कैलाससिंह ठाकूर अशी झाली. त्यानंतर त्याचा खून करणारे तीन आरोपी योगेंद्र गेंदासिंह ठाकूर, सुरेंद्र गेंदासिंह ठाकूर आणि निलेश सुर्यजन असे तीन मारेेकरी नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने पकडले. मयत गजेंद्र ठाकूरची आजी रेणुकाबाई सुरेंद्र ठाकूर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गजेंद्रला 19 मार्च रोजी दुपारी 2 वाजता योगेंद्र आणि सुरेंद्र ठाकूर बंधू, निलेश सुर्यजन, चारुदत्त आणि बालाजी वाघमारे या पाच जणांनी माझ्यासमोरच दुचाकीवर बसून घेवून गेले होते. त्यानंतर त्याचा मृतदेह सापडला. दोन महिन्यापुर्वी झालेल्या जुन्या भांडणांच्या कारणावरुन या पाच जणांनी गजेंद्र उर्फ गज्जू उर्फ बाल्टीचा खून केला. त्यांच्यावर कार्यवाही व्हावी. तसेच हे खूनाचे कृत्य घडविण्यात त्यांचे इतर सहकारी असू शकतात त्यांच्यावरही कार्यवाही व्हावी. आदरणीय पोलीस निरिक्षक श्री.अशोकरावजी घोरबांड साहेब यांच्या आदेशाने गुन्हा क्रमांक 175/2022 दाखल करण्यात आला. त्यामध्ये भारतीय दंडसंहितेची कलमे 302, 201 आणि 34 जोडलेली आहेत. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक सुरेश थोरात यांच्याकडे देण्यात आला.
आज दि.23 मार्च रोजी सुरेश थोरात आणि त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार यांनी सुरेंद्र ठाकूर, योगेंद्र ठाकूर आणि निलेश सुर्यजन या तिघांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर करून तपासासाठी पोलीस कोठडी आवश्यक असल्याचा मुद्दा मांडला. युक्तीवाद ऐकून न्या.एम.बी.कुलकर्णी यांनी तिघांना चार दिवस,अर्थात २७ मार्च २०२२ पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.