वीज वितरण कंपनीवर सुध्दा ग्राहकांना झालेल्या त्रासाची जबाबदारी निश्चित होणे आवश्यक
नांदेड(प्रतिनिधी)-वजिराबाद भागातील तरोडेकर मार्केट समोरच्या रस्त्यावर असलेले जवळपास 100 वर्षापुर्वीचे लिंबाचे झाड काल दि.23 मार्च रोजी सायंकाळी कोसळले. सुदैवाने भले मोठे झाड कोसळल्यावर सुध्दा जिवीत हानी झाली नाही. झाडाच्या सोबत वीज वितरण कंपनीच्या अनेक तारा तुटल्या आज दुसरादिवस उजाडल्यानंतर सुध्दा वीज वितरण कंपनीने तुटलेल्या तारांची दुरूस्ती तर केलीच नाही पण नागरीकांना होणाऱ्या त्रासाचा विचारही केला नाही.
नांदेड शहरात वजिराबाद भागात मुख्य रस्त्यावर तरोडेकर मार्केटसमोरच्या विरुध्द बाजूला जवळपास 100 वर्ष जुने एक लिंबाचे झाड होते. काल दि.25 मार्च रोजी रात्री 7 वाजता अचानकच हे झाड कोसळले. घटना घडली तेंव्हा या रस्त्यावर भरपूर गर्दी होती. त्या झाडाखाली एक पान विके्रता सुध्दा कायम बसतो. झाड खाली येताच वीज वितरण कंपनीच्या अनेक तारा तुटल्या आणि अंधार झाला. यात सुध्दा त्या झाडाखाली अडकेलेल्या एका महिलेला एकजुट दाखवत लोकांनी झाडाला हलवून त्या अडकेलेल्या महिलेला बाहेर काढले. त्यांच्या डोक्याला थोडी जखम झाली होती. त्या झाडाखाली बसणारा पान विके्रता पण थोडक्यात वाचला. अंधार झाल्यानंतर आणि झाड कोसळल्याची माहिती मिळाल्यानंतर वजिराबादचे पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार, पोलीस उपनिरिक्षक गोविंद जाधव आणि अनेक पोलीस अंमलदार तेथे आले. झाड पडल्यामुळे झालेली वाहतुकीची कोंडी सोडवली. पोलीसांनी अत्यंत द्रुतगतीने हे दुर्घनास्थळ गाठले होते.
झाड पडल्यामुळे त्या वजनाने रस्त्यावरील अनेक दुचाकी गाड्यांची वाट लागली. सोबतच तरोडेकर मार्केट समोरील वीज वितरण कंपनीचा एक खांब वाकून गेला. असंख्य घरे आणि दुकानांचा विद्युत पुरवठा बंद झाला. तरी पण वीज वितरण कंपनीने या घटनेकडे सहजतेनेच पाहिले. सध्या उन्हाचा उकाडा भरपूर आहे. आणि त्यामुळे वीज ही आजच्या परिस्थितीत जीवनावश्यक वस्तु आहे. आज सकाळी तरच नाहीच दुपारी 12.30 वाजेपर्यंत तरी बंद असलेला विद्युत पुरवठा सुरू करण्यात वीज वितरण कंपनीला कांही एक रस दिसला नाही. यावरून अपघात घडल्यास त्यासाठी पर्यायी उपाय योजना करणे प्रत्येक विभागाची जबाबदारी आहे. पण कालच्या अपघातानंतर आज दुपारपर्यंत बंद असलेला विद्युत पुरवठा पाहुन विज वितरण कंपनीला ग्राहकांच्या सेवा योग्य वेळेत देणे यावर कांही बंधनच नसल्याचे दिसले. कांही जणांनी फोन केला तर त्यांना असे सांगितले जात होते की, खांब वाकला आहे तो आज दुरूस्त होईल की, नाही हेही सांगता येत नाही. वीज वितरण कंपनीने आपल्याच ग्राहकांना चोर म्हणण्याची परिस्थिती तयार केली तेंव्हा त्यांच्यावरच्या जबाबदाऱ्यांना सुध्दा विद्युत नियामक आयोगाने निश्चित केलेले आहे. त्यानुसार त्यांच्यावर सुध्दा जी कांही कार्यवाही विद्युत कायद्याला अभिप्रेत आहे ती होणे आवश्यक आहे.
आज 26 मार्चचा दिवस उजाडल्यानंतर पडलेल्या झाडाची पाहणी केली असता तेथे खोड शिल्लक होते. फांद्या रात्रीच कापून दुसरीकडे नेण्यात आल्या आहेत. या झाडाच्या मुळांची पाहणी केली असता या झाडांच्या मुळांना हळूवारपणे विष (ऍसीड) दिले असल्याचे दिसते. ऍसीडच्या प्रभावाने हळूहळू या झाडाची मुळे कुजली आणि ज्या मुळांमध्येच झाडाला टिकविण्याची ताकत असते. ती ताकत समाप्त झाल्याने 25 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता हे झाड कोसळले आहे. मुळांमध्ये ऍसीड विष पेरून झाडांना पाडण्याइतपत कट रचण्याची गरज नव्हती. कायदेशीर रित्या त्याची परवानगी घेवून सुध्दा झाड पाडता आले असते. त्यामुळे काल झालेली दुर्घटना घडली नसती. सुदैवाने दुर्घटना घडली असली तरी त्यात जीवीत हाणी झाली नाही हेच मोठे भाग्य. दुर्घटनेनंतर निवडक नागरीकांना बिना विद्युत जगावे लागले. याची जबाबदारी सुध्दा सुनिश्चित केली गेली. पाहिजे जेणे करून दुसऱ्यांना वीज वितरण कंपनी अशा दुर्घटनेप्रसंगी पर्यायी योजनांसह तयार राहिल.
