एक जबरी चोरी, तीन चोऱ्या, दोन दुचाकी चोऱ्या ; 3 लाख 34 हजारांचा ऐवज लंपास

नांदेड(प्रतिनिधी)-माळाकोळी परिसरातील पवार तांडाजवळ एक जबरी चोरी झाली. उमरी येथे एक शटर फोडून चोरी झाली. विमानतळ रस्त्यावर टाटा शोरुम फोडण्यात आले आणि विमानतळ तसेच वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन दुचाकी गाड्या चोरीला गेल्या आहेत. या सर्व चोरी प्रकरांमध्ये 3 लाख 33 हजार 380 रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.
विकास केशव जायभाये यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 26 मार्च रोजी सकाळी 11 वाजता पवार तांडाजवळ कापुस विकून आलेले 50 हजार रुपये घेवून माळाकोळीकडे जात असतांना कांही लोकांनी त्याला थांबवून दोन वर्षापुर्वी घेतलेले 5 हजार रुपये त्यांना मागितले. तेंव्हा तुमचे पैसे नंतर देतो सध्या माळाकोळी येथील घेतले पैसे देण्यासाठी जात आहे असे जायभाये यांनी सांगितले. त्यावेळी शिव्या देवून माझे पैसे दे असे सांगून त्यांच्याकडील 50 हजार रुपये आणि मोटारसायकल असा 90 हजारांचा ऐवज बळजबरीने घेवून गेले आहेत. माळाकोळी पोलीसांनी याप्रकरणी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक मुंडे अधिक तपास करीत आहेत.
मोहसीन अली अजगर अली यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचा व्यवसाय चांदीचे दागिणे तयार करण्याचा आहे.दि.26 मार्च रोजी सकाळी 5 ते 27 मार्चच्या सकाळी 9 वाजेदरम्यान नगर पालिका कम्पाऊंड उमरी येथील त्यांचे दुकान फोडून चोरट्यांनी त्यातून चांदीचे जोडवे, अंगठ्या असा 35 हजार 900 रुपयंाचा ऐवज चोरून नेला आहे. उमरी पोलीसांनी हा चोरीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस हवालदार कदम अधिक तपास करीत आहेत.
टाटा कंपनीचे व्यवस्थापक विजय मारोती मोरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 27 मार्चच्या पहाटे 4 ते 4.45 दरम्यान विमानतळ रस्त्यावरील टाटा नॅक्सोन हे शोरुम फोडून चोरट्यांनी त्यातील कॅश कॉऊंटर तोडले आणि त्यातून 1 लाख 4 हजार 480 रुपये रोख रक्कम चोरील आणि 1 लाख 20 हजार रुपयांचे नुकसान केले. विमानतळ पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक गौंड अधिक तपास करीत आहेत.
विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामनगर रस्त्यावरून एम.एच.12 बी.पी.2963 ही 63 हजार रुपये किंमतीची दुचाकी गाडी 17-18 मार्चच्या रात्री चोरीला गेली. विद्यार्थी असलेल्या राधाकिशन बालासाहेब आबुके यांच्या तक्रारीवरुन विमानतळ पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस अंमलदार गायकवाड हे करीत आहेत.
बालाजी विश्र्वभंर चलावार यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 बी.यु.6163 ही दुचाकी गाडी, 40 हजार रुपये किंमतीची मारोती मंदिर गुरूद्वारा चौक येथून 18 मार्चच्या सायंकाळी 7 ते 7.30 वाजेदरम्यान चोरीला गेली आहे. वजिराबाद पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार सुभाष राठोड अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *