नांदेड(प्रतिनिधी)-50 लाखांची बॅग चोरणाऱ्या तिन चोरट्यांनी पोलीस कोठडीच्या काळात 1 लाख 40 हजार रुपये जप्त करण्यात पोलीसांना यश आले आहे. या चोरट्यांमधील अद्याप पाच जण पोलीसांना पकडायचे आहेत. त्यातील तीन जण गुजरात राज्यात अटकेत आहेत.
दि.15 डिसेंबर 2021 रोजी मनजित कॉटन भोकर या कंपनीची चार चाकी वाहन बाफना टी पॉईंटजवळ उभी असतांना त्यातील 50 लाख रुपये असलेली बॅग घेवून दोन चोरटे दुचाकीवर पळून गेले. स्थानिक गुन्हा शाखेने याचा शोध लावला आणि जेंव्हा यांचा शोध लागला तेंव्हा ते गुजरात राज्याच्या तुरूंगात होते. तेथून नांदेड पोलीसांनी रमेश उर्फ पप्पु रवि थाला (26), राजेशप्रभु मेकाला (29), आप्पाराव वसंतम गोडेट्टी सर्व रा.जि.नेल्लूर आंध्रप्रदेश यांना पकडून आणले. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने 24 मार्च रोजी या तिघांना 30 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले होते.
आज पोलीस कोठडी संपल्यानंतर पोलीस उपनिरिक्षक दत्तात्रय काळे यांनी त्यांच्या सहकारी पोलीस अंमलदारांनी या तिघांना न्यायालयात हजर केले. न्यायालयातील अभिलेखानुसार पोलीस कोठडी दरम्यान या तिघांकडून 1 लाख 40 हजार रुपये जप्त करण्यात पोलीसांना यश आले आहे. या प्रकरणातील इतर तीन आरोपी जे गुजरात तुरूंगात आहेत. त्यांना पकडून आणायचे आहेत आणि दोन फरार लोकांना शोधून पकडायचे आहे.नांदेड न्यायालयाने आजच्या तीन आरोपी न्यायालयीन कोठडीत पाठवले आहेत.
मागील बातमी….
https://vastavnewslive.com/2022/03/24/50-लाखांची-बॅग-चोरी-तिघांना/