नांदेड,(प्रतिनिधी)- अपर पोलीस अधिक्षक भोकर कार्यालयाच्या अखत्यारीत काम करणाऱ्या उमरी पोलीस ठाण्यातील पोलीस उप निरिक्षक शेख नजीरला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आपल्या ताब्यात घेतल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे.
एका अपघात प्रकरणातील आरोपीला मदत करण्यासाठी उमरी येथील पोलीस उप निरिक्षक शेख नजीर यांनी 11 हजार लाच मागीतली.या बाबत तक्रार आल्या नंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आज पडताळणी केली आणि आज रात्री 7 वाजता उमरी येथेच लाच सापळ्यात शेख नजीर अडकला.11 हजार रुपये सापडले आहेत अशी माहिती प्राप्त होत आहे. वृत लिही पर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार शेख नजीर लाच लुचपत प्रतिबंधक विगागाच्या ताब्यात आहे.